खानापूर लाईव्ह न्यूज/ प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील कौलापूरवाडा येथील पोल्ट्री प्रकरण म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा सुरू आहे. या लढ्यामध्ये खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली असून या पोल्ट्री विरोधात तीव्र आंदोलनाचा लढा हाती घेतला आहे. या अनुषंगाने आज रविवारी दुपारी चारच्या दरम्यान बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद ,जिल्हा पंचायत मुख्य कार्य निर्वाहक अधिकारी राहुल शिंदे यांनी जांबोटी येथे भेट धावती भेट घेतली असता त्या ठिकाणी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने एक निवेदन सादर करून कौलापूरवाडा येथील जनतेच्या आरोग्याची होणारा खेळ थांबवा व येथील जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. डीसी ना निवेदन देण्यासाठी महादेव कोळी, ॲड. ईश्वर घाडी, दिपक कवठनकर, महांतेश राऊत, विनायक मुतगेकर, सुरेश भाऊ, भैरू पाटील, सखुबाई पाटील, प्रदीप कवठनकर, ज्ञानेश्वर कसरलेकर, कौलापूरवाड्याचे ग्रामस्थ व महिला तसेच जांबोटी भागातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कौलापूरवाडा गावापासून अवघ्या शंभर मीटरवर असलेला तथा बेकायदेशीर रित्या सुरू असलेला कॉलिटी पोल्ट्री प्रकल्प हा धोकादायक आहे. येथील जनतेला पोल्ट्रीच्या दुर्गंधीमुळे जगणे मुश्किल झाले आहे यासाठी गेल्या 10-15 वरपासून लढा सुरू आहे. केवळ धनशक्तीच्या वापरावर येथील जनतेच्या आरोग्याची खेळण्याचा प्रकार स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अवलंब आहे. यासाठी आपण याची तातडीने कारवाई करून जनतेच्या आरोग्याची होणारा हा खेळ थांबवावा अशी मागणी यावेळी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी अधिवक्ते ईश्वर घाडी सुरेश जाधव सह काँग्रेसच्या नेत्यांनी या पोल्ट्री फार्म संदर्भात संपूर्ण माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडली.
सगळं प्रकरण गंभीर असून वेळीच यावर कारवाई झाली नाही तर आपण न्यायालयीन लढाई देखील लढवण्यास सज्ज आहोत. यासाठी तातडीने कारवाई करावी अशी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस माजी अध्यक्ष ईश्वर घाडी यानी विनंती केली.
प्रतिक्रिया:
आम्ही डे वन पासून सांगतोय प्रशासनास लोकांच्या आरोग्याचे काही देणे घेणे नाही… तरीही लोकशाही मार्गाने खानापूर तालुका कॉंग्रेस कौलापुरवाड्याच्या जनतेसोबत आहोत.व पुढेही शेवटपर्यंत राहू, हा लढ़ा धनशक्ती विरूद्ध जनशक्ति असा आहे त्यामु़ळे प्रशासनाकडून आम्हास जास्त अपेक्षा नाहीत. “माणसे मेली तरी चालतील कोंबड्या जगल्या पाहीजेत” या न्यायाने जनतेशी वागू नका. लोकांच्या आरोग्यांशी खेळून तुम्ही इंडस्ट्री जगवू नका….. इंडस्ट्री तुम्ही शिफ्ट करा अशी आमची व जनतेची मागणी आहे…. आणि तुम्ही जनतेस न्याय द्याल अशी आमची अपेक्षा आहे.
प्रतिक्रिया : सुरेश जाधव ,काँग्रेस नेते:
____________________________________
प्रतिक्रिया:
समजा प्रशासन धनशक्ती पुढे वाकले तर मात्र कौलापूरवाड्याच्या जनतेचा लढा आम्ही तीव्र करू….
मग आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल….
न्यायालयाचा मार्ग अवलंबावा लागेल …. पुढे सरकार दरबारी जावे लागेल पण आम्ही मागे हटणार नाही.आम्ही जनतेच्या आरोग्यासाठी धनशक्ती विरूद्ध नेटाने लढू …
प्रतिक्रिया : महादेव कोळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष: