खानापूर लाईव्ह न्यूज/ प्रतिनिधी
बेळगाव -पणजी व्हाया चोरला राष्ट्रीय महामार्गावरील मलप्रभा नदीवरील कुसुमळी नजीकच्या ब्रिजची आज जिल्हाधिकारी महम्मद रोशन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. पहाणी नंतर ब्रिजवरील संभाव्य धोका लक्षात घेता या मार्गावर होणाऱ्या अवजड वाहतुकीसह बसेसही बंद करण्यात याव्यात अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे . बेळगाव -पणजी अनमोड मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद झाल्याने चोरला मार्गे अवजड वाहतुकीला वेग आला आहे. पण या मार्गात देखील होणारे अडथळे ,दरड कोसळणे तथा रस्त्याची दयनीय परिस्थिती लक्षात घेता या मार्गावरून अवजड वाहतूक त्वरित थांबवावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. शिवाय नदीवरील हा ब्रिज अधिक कमकुवत झाल्याने या मार्गावरून वाहतूक पूर्णतः बंद करावी याची दखल लक्षात घेता आज रविवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज पाहणी दौरा करण्यात आला.
अवजड वाहने तेवढीच नव्हे तर बसेसही बंद!
कुसमळी ब्रिजवर वाढता धोका लक्षात घेता या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी आहे. आज जिल्हाधिकारी महम्मद रोशन यांनी पाहणी करून या ब्रिजचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यासाठी आपण पावले उचलू असे सांगितले. शिवाय सध्य परिस्थितीत पावसाळा असाच सुरू राहिल्यास या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिज चा संभाव्य धोका लक्षात घेता या मार्गावरून होणाऱ्या बसेस देखील बंद ठेवाव्यात. यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचित केल्याचे कळते.
शंकरपेठ चढाव रस्त्याची देखील पाहणी!
जिल्हाधिकारी सह पथकाने कुसमळी ब्रिज ची पाहणी करून जांबोटी मार्गे शंकरपेठ चढावावरील ब्रिजची व रस्त्याची पाणी केली. या ठिकाणी पडलेला खड्डा व धोक्याचा प्रवास या संदर्भातही राज्यमार्ग विभागाला सूचना केल्या तातडीने या ठिकाणची दुरुस्ती करून वाहतुकीला अडथळा येणार नाही. याची काळजी घेण्याची सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्याचे समजते.
हालत्री नाल्यावरील ब्रिजची पाहणी.
दरम्यान सायंकाळी सहा नंतर जिल्हाधिकारी व पथकाने खानापूर तालुक्यातील अतिवृष्टीची संपूर्ण माहिती घेतली व हालात्री नाल्यावरील ब्रिज तसेच रस्त्याची देखील धावती पाहणी केली. नाल्यावरील हा ब्रिज प्रतिवर्षी चर्चेचा मोठा पावसाळा आला की आठवडाभर या मार्गावरील वाहतूक बंद होते. त्यामुळे हेमडगा मार्गे गोव्याला होणारी वाहतूक पूर्ण होते. यामुळे केवळ वाहतूकच बंद होत नसून हा ब्रिज हाती धोक्याचा बनला आहे. या ब्रिजला कोणत्याही प्रकारे दुथर्पा कठडा नसल्याने वाहनधारकांचा जीव धोक्याचा ठरतो. या ब्रिजची नव्याने निर्मिती करण्यात यावी यासाठी अनेक वेळा अनेक मंत्र्यांनी आजी-माजी आमदारांनी राज्य सरकारपर्यंत सूचना केल्या आहेत. पण याची कोणत्याच प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याने हा ब्रिज केवळ पाहणी दौऱ्याचा ठरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही यासंदर्भात तातडीने राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात अहवाल तयार करण्यात यावा अशी सूचना संबंधित विभाग तसेच तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना केली आहे.