IMG-20240716-WA0070

अंकोला : अंकोला तालुक्यातील शिरूरजवळ मोठा डोंगर कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांसह 7 जण मातीखाली गेल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी घडली आहे. या घटनेत सात जण मृत्यू पावल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. घटनास्थळी खासदार विश्वेश्वर कागेरी हेगडे, माजी आमदार रूपाली नाईक सह यांनी भेट देऊन पाहणे केली आहे .

या घटनेत लक्ष्मण नायक (47), शांती नायक (36), रोशन (11), अवंतिका (6) आणि जगन्नाथ (55) अशी मृतांची नावे आहेत. या दोघांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

गॅस टँकर वाहुन गेला नदी पात्रात ! गॅस गळतीची नागरिकात भीती

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, शिरुर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने गॅसचे दोन टँकर गंगावली नदीत वाहून गेल्याची घटना घडले असून त्या ठिकाणी गॅस गळती होण्याची भीती निर्माण झाली आहे .

महामार्गावर उभा असलेला टँकरही गंगावली नदीच्या पात्रात वाहून गेल्याने चालक व क्लिनरचाही मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

महामार्गालगतच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पाण्याच्या टाकीत एक लॉरी चालक आणि क्लिनर असे चार जण अंघोळ करत होते त्याच दरम्यान दरड कोसळली व बाजूला असलेला टँकरही गंगावदी नदीच्या पात्रात वाहून गेला असल्याची माहिती मिळाली आहे. टेकडीखाली किती लोक अडकले आहेत हे बचावकार्यानंतरच कळणार आहे.

याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे आणि चौपदर महामार्गाच्या बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या कंपनीच्या अशास्त्रीय व अपूर्ण कामामुळे राष्ट्रीय महामार्ग 66 च्या अंकोला कुमाता मार्गाच्या मध्यभागी शिररू बोम्मय्या मंदिराजवळ मोठा डोंगर कोसळला. यामुळे या मार्गावरून वाहतूक आज दिवसभर पूर्णतः ठप्प आहे.  

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us