पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा मोठा अपघात झाला आहे, या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. ही ट्रॅव्हलर बस पंढरपूरकडे निघाली होती. या बसमधून ५४ वारकरी प्रवास करत होते. या अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ५४ वारकरी पंढरपूरकडे जात होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅव्बल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ट्रॅव्हल्स अनिंयंत्रित होऊन थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली.
अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी आहेत, तर २० ते ३० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.