खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
पंढरपूर आषाढी एकादशीचे वेध वारकऱ्यासह भाविकात लागले आहेत. येत्या बुधवार दि. 17 तारखेला आषाढी एकादशी असल्याने वारकरी पंढरीच्या दिशेने जाण्यासाठी रवाना झाले आहेत. अनेक जण स्वतःच्या वाहनाने जात आहेत. तर अनेक वारकरी व भाविक रेल्वेचा आधार घेत पंढरपूरला जातात. वारकऱ्यांची सुविधा व्हावी व भाविकांना सोयीचे व्हावे यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेने (SWR) जारी केलेल्या प्रेस रिलीझनुसार, ट्रेन क्रमांक 06295 ही SMVT बेंगळुरू येथून 15 जुलै 2024 रोजी रात्री 10:00 वाजता सुटेल.
लोंढा, बेळगाव मार्गे धावणारी ही रेल्वे दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी 06:20 वाजता पंढरपूर स्थानकात पोहोचेल. दरम्यान मंगळवारी सकाळी 7.30 आळणावर 8.30 वाजता लोंढा रेल्वे स्टेशन तर 9 वाजता खानापूर रेल्वे स्थानक व 10 वाजता बेळगाव येथे रेल्वे पोहोचणार आहे. या पद्धतीने एक विशेष रेल्वे सोडली आहे . त्यामुळे भाविकांची चांगली सोय होणार आहे.