IMG_20240709_202448

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

2018 ते 2023 या कालावधीत खानापूर तालुक्यातील जनतेने काँग्रेस पक्षाला प्रतिनिधित्व दिले. कर्नाटक राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असतानाही खानापूर तालुक्याच्या विकासासाठी अनेक प्रकारे निधी आणून ती प्रामाणिकपणे राबवण्याचा प्रयत्न काँग्रेसचे आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केला आहे. खानापुरात येत्या 12 जुलै रोजी लोकार्पण होत असलेल्या हायटेक बस स्थानक इमारत तसेच एमसीएच इमारत व हेस्कॉम कार्यालय या तीनही इमारतीसाठी डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपल्या आमदारकीच्या काळात विशेष प्रयत्न करून मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने केलेल्या विकासाभिमुख कामाचे श्रेय घेणारच यात शंका नाही. त्यामुळे भाजपवाल्यांनी जनतेत नाहक गैरसमज तयार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. शिवाय येत्या शुक्रवार दि. 12 जुलै रोजी होणारा उद्घाटन सोहळा हा खानापूर तालुक्याच्या विकासाचे एक पाऊल आहे. काँग्रेसच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्यकाळात 90% काम पूर्ण झाले असताना आपण त्याचे श्रेय का घेऊ नये असा सवाल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी मंगळवारी खानापूर येथील विश्रामदामात बोलवल्या पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेसची पत्रकार परिषद व्हिडिओ

काल सोमवारी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील विश्राम जमत एक पत्रकार परिषद घेण्यात आली, या पत्रकार परिषदेत विकास कामाच्या श्रेय वादावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. काँग्रेसवर केलेल्या आरोपाचे खंडन करत आज मंगळवारी पुन्हा तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, महानतेस राऊत, रियाज पटेल महंमद काझी, यशवंत बिरजे, ईश्वर बोभाटे, राजू पाटील, काशीम हट्टीहोळी, विनायक मुतगेकर, रमेश पाटील, बसेट्टी सावकार, संदीप देसाई, पांडुरंग मिटगार, गुड्डू टेकडी, तोहीत चांदकणावर, दिपक कवठनकर,
रमेश पाटील एक्स टीपी, दत्ता बीडकर , सुर्यकांत कुलकर्णी, ब्लॉक महिला अध्यक्ष अनिता दंडगल, सावित्री मादार, सखुबाई पाटील, गीता अंबरगट्टी आदी उपस्थित होते.

  • भाजपवाल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.

कालच भारतीय जनता पार्टीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी एका पत्रकार परिषदेद्वारे केवळ राजकीय आकसापोटी समाजात विष पेरण्याचे काम करण्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. मागील पाच वर्षात जी विकासाची कामे झाली त्यावरून श्रेय वादाचा उठाठोह केला जात आहे. गेल्या सव्वा वर्षात भाजपच्या लोकप्रतिनिधी काय काम केले हे दाखवावे. तालुक्यात अनेक समस्या भेडसावत आहेत याकडे लक्ष नाही. मात्र माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीवर मात्र नाहक टीकेचा आगडोंब करणे हा राजकीय स्वार्थ म्हणावा लागेल. केवळ हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपवाले करत आहेत हे करण्यापेक्षा विकासाकडे लक्ष देऊन तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, जनतेची दिशाभूल करू नये.

माजी आमदारानी आपले तोंड आवरावे .. सुरेश जाधव

देशाचे राजकारण कोणा एका पक्षाला मक्ता दिले नाही लोकशाही राज्यात हार पराजय या दोन्ही चालतात त्यामुळे सत्ता कायमच आपल्या हाती असेल असे कोणीच म्हणू शकत नाही.माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सुरुवातीच्या काळात केलेल्या प्रयत्नात दुसऱ्या प्रयत्नातच त्यांना तालुक्याने आमदारकी दिली तर भाजपचे विद्यमान आमदार व माजी आमदार यांना तीन-तीन वेळा निवडणुका लढवून आमदारकी मिळवणे शक्य झाले. त्यामुळे कोणीही बढाया मारू नये असा सवाल उपस्थित करून माजी आमदार अरविंद पाटील तिसऱ्या वेळी सलग चौथ्या क्रमांकावर का गेले ? याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आज हिंदुत्वचा मुद्द्यावर आपण शब्दाशी ठाम असून सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करतो म्हणणाऱ्या या नेत्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आपले प्रथमता आत्मपरीक्षण करावे. मार्केटिंग सोसायटी सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत झालेल्या खत विक्रीतील अपराथपर किंवा डीसीसी बँकेमध्ये खानापूर तालुक्यातील बेरोजगारांना का संधी नाही, याचे प्रथमता त्यांनी उत्तर द्यावे त्यानंतरच आम्हाला शहाणपण शिकवावे असा खडा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बोलताना सुरेश जाधव म्हणाले, खानापुरातील हायटेक बस स्टँड हे 2020 डिसेंबर मध्ये प्राथमिक मंजूरीला गेले. तब्बल 7 कोटी 35 लाखाचा निधी मंजूर झाला. त्याची निविदा अगस्त 2021 मध्ये झाली .लागलीच कामाला सुरुवात झाली, यासाठी डॉ. अंजली निंबाळकर यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत त्यामुळेच दिमागदार इमारत उभी आहे त्याचप्रमाणे खानापुरात उभारलेले एमसीएस हॉस्पिटल याला 15 कोटीचा निधी मंजूर झाला. 2019 मे मध्ये सदर कामाची निविदा मंजूर झाली व लागली 18 महिन्यात काम पूर्ण करण्यासाठी ही निविदा मंजूर झाली त्यानुसार सुसाज्याची इमारत उभारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खानापुरातील हेच काम कार्यालयात ट्रान्सफर दुरुस्ती कक्ष याबरोबर शासकीय इमारत नवीन बांधण्यासाठी डॉ. अंजली निंबाळकर यांचे विशेष प्रयत्न कारणीभूत आहेत. त्यामुळेच या तीनही इमारती दिमाखात उभे असून याला काँग्रेस माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकरच या पूर्णतः कारणीभूत असून याचे श्रेय का घेऊ नये असा सवाल यावेळी काँग्रेस येथे सुरेश जाधव यांनी उपस्थित केला.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us