IMG_20240708_191704
  • खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
  • कर्नाटक राज्य सरकारने शासकीय तथा निमशासकीय इमारतीवर नियमानुसार 60 टक्के कन्नड भाषेत तर 40 टक्के स्थानिक भाषेत नामफलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. असे असताना खानापुरात नव्याने होत असलेल्या नवीन हायटेक बस स्थानक तसेच माता आणि शिशु नूतन इमारतीवर केवळ कन्नड मध्ये नामफलक लावण्यात आला आहे. त्यामुळे येथील मराठी भाषिकांच्या वर अन्याय होताना दिसतो आहे.याबाबत तिन्ही खात्याच्या अधिकाऱ्यांना तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना मराठीतून नाम फलक लावण्याची अनेक वेळा मागणी केली होती. त्या मागणीची दखल न घेता केवळ कन्नड भाषेतून नामफलक उभारण्यात आले आहेत. त्यांनी इमारती उद्घाटनासाठी सज्ज झाले आहेत. या इमारतींच्या उद्घाटनाला मराठी भाषिकांचा अजिबात विरोध नाही, तथापि तालुक्यातील सर्वसामान्य मराठी भाषिकांची भाषेची अडचण ओळखून इमारतीवरील नाम फलक आणि अंतर्गत भागातही मराठीचा वापर होणे आवश्यक आहे. राज्य सरकारचा स्वतःचाच 60% कन्नड आणि 40% अन्य भाषा असा नियम आहे. सगळ्यांवर या नियमाची सक्ती करणाऱ्या राज्य सरकारला स्वतःच्याच सरकारी इमारतीवर लावण्यात आलेल्या फलकांच्या बाबतीत या नियमाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपला नियम पाडून दाखवावा तसेच हेस्कॉम, नवीन बसस्थानक आणि एमसीएच हॉस्पिटल या त्यांनी इमारतींवर 12 तारखेच्या आत मराठीतूनही नामफलक लावावेत अन्यथा 12 तारखेला उद्घाटन कार्यक्रमाला येणाऱ्या मंत्री महोदयांसमोरच तीव्र निदर्शने करण्यात येतील. असा इशारा वजा निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आमदार विठ्ठल हलगेकर, तहसीलदार प्रकाश गायकवाड देण्यात आले.
  • आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन:
आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्ट मंडळ
  • महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना एक निवेदन सादर केले व नियमानुसार कानडी बरोबर मराठीत नाम फलक लावण्याची विनंती तसेच खानापूर येथील शासकीय विश्रामनामात उपस्थित आमदार करून आपण मराठी भाषिक आहात खानापूर तालुक्यात कन्नड बरोबर मराठीमध्ये नाम फलक लावणे अत्यंत गरजेचे असून यासाठी आपण विशेष प्रयत्न करावेत व मराठी भाषिकांची समस्या दूर करावी अशी मागणी केली.
  • सदर निवेदनाचा स्वीकार करून आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शासकीय इमारतीवर कानडी बरोबर मराठीत फलक लावण्यासाठी आमचेही प्रयत्न आहे तर त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून कन्नड बरोबर मराठीत नाम फलक लावण्यासाठी माझे प्रयत्न राहतील असे आश्वासन समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
  • दरम्यान खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची शिवस्मारकात बैठक झाली या बैठकीत खानापूर तालुक्यातून समितीची संघटना बळकट करणे संदर्भात चर्चा करण्यात आली व 12 तारखेला होणाऱ्या नवीन शासकीय कार्यालयांच्या उद्घाटना संदर्भात चर्चा करून आपण या कार्याला सकारात्मक सहकार्य करूया, मात्र शासनाच्या नियमानुसार कानडी बरोबर मराठी मध्ये नाम फलक लावण्यात यावे यासाठी निवेदन देण्याचा ठराव करण्यात आला. या बैठकीला तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, चिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळराव पाटील, पांडुरंग सावंत, शिवाजी पाटील, रणजीत पाटील, शंकरराव पाटील, संजय पाटील, पुंडलिक पाटील, रामचंद्र गावकर , ए, आर. मुतगेकर, एडवोकेट केशव कळेकर, आधी उपस्थित होते.

कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा ! समितीने फेटाळला!

  • दरम्यानच्या बैठकीत नुकताच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले निरंजन उदयसिंह सरदेसाई यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा समितींच्या पदाधिकाऱ्यांचे कडे यावेळी सुपूर्द पण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी दिलेल्या राजीनामाचा स्पष्ट शब्दात नकार दर्शवत त्यांना समितीच्या कार्यात कायम कार्यरत राहावे अशी विनंती करण्यात आल्या असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी दिली.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us