खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:
- खानापूर शहरातील प्रतिष्ठित असलेल्या खानापूर को ऑप बँकेत नुकताच 15 कर्मचार् याची नोकर भरती प्रक्रिया पार पडली. मात्र या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला, शिवाय या नोकर भरती प्रक्रियेमध्ये हुशार विद्यार्थ्यांना सोडून आपल्या मर्जीतील उमेदवारांना बँकेत नोकरीत सामावून घेण्यात आले असल्याचा आरोप खानापुरातील माजी नगरसेवक व आपलं खानापूरचे संपादक दिनकर मरगाळे यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केली.
- या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, खानापूर को- ऑप बँकेची नुकताच 15 कर्मचाऱ्यांची नोकर भरती प्रक्रिया पार पडली. या भरती प्रक्रियेत कायदेशीर बाबी अपूर्ण ठेवून ती पूर्ण करण्यात आली आहे या संदर्भात आपण खानापूर को -op बँक, जिल्हा सहाय्यक निबंधक तसेच जिल्हा उपनिबंधकांना माहिती हक्क कायद्याखाली या भरती प्रक्रिये विषयी माहिती मागितली असता ती देण्यास त्यांनी नकार दर्शविला आहे. वास्तविक एखाद्या संस्थेची कोणतीही माहिती सभासदांनी मागितली तर ती देणे क्रमपात्र असताना ती न देण्यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या बँकेत झालेला गैरव्यवहार तसेच ज्या इच्छुक उमेदवारांच्या वर अन्याय झाला आहे, अशांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून अशांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहनही दिनकर मरगाळे यांनी या पत्रकार परिषदेत केले.
नोकर भरती प्रक्रिया पारदर्शक! चेअरमन अमृत शेलार यांचा खुलासा!
- खानापूर को ऑप बँकेमध्ये झालेली नोकर भरती ही कायद्याच्या चौकटीत व पारदर्शक झाली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नाही, केवळ आकसापोटी काहींनी या भरती विरोधात गरळ ओकली आहे. त्यामुळे अशावर कोणीही विश्वास ठेवू नये असा खुलासा खानापूर को ऑपे बँकेचे चेअरमन अमृत शेलार यांनी केला आहे .
- यावेळी ते म्हणाले, खानापूर को ऑप बँक ही खानापूर तालुक्यातील मोठी सहकारी बँक आहे. गेल्या शंभर वर्षात या बँकेने अनेक भरती प्रक्रिया ज्या धर्तीवर केल्या त्याच धर्तीवर यावेळीही केल्या आहेत. बँकेची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी शाखा सुरू करण्याचा मानस संचालक मंडळाने घेतला आहे. त्या अनुषंगाने या बँकेत कर्मचाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेता ही भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली. या नोकर भरतीतील 15 जागा करिता जवळपास 250 हून अधिक अर्ज आले होते. त्यापैकी आवश्यक परीक्षा व जिल्हा सहकार विभागांच्या सल्ल्यानुसार ही भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे झालेल्या आरोपावर कोणीही विश्वास ठेवू नये असे त्यांनी यावेळी खुलाशात म्हटले आहे.