खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
चन्नेवाडी ता. येथील शाळा गेली अनेक वर्षांपासून बंद होती पण गावकरी व पालकांनी केलेल्या प्रयत्नांनी तसेच पाठपुराव्याने यावर्षी म्हणजेच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात करण्यात आली. शाळेची नवीन शाळा सुधारणा कमिटी नेमण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी शंकर पाटील तर उपाध्यक्षपदी रेणुका दत्ताराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. तर प्रभारी म्हणून निवृत्त शिक्षक प्रकाश पाटील,विठ्ठल पाटील,आर.डी.पाटील, मुरलीधर पाटील तर सदस्यपदी सुधाकर पाटील,दत्ताराम पाटील,लक्ष्मण पाटील,उदय पाटील,श्रद्धा पाटील,रेणुका सु.पाटील,सावित्री पाटील,स्वाती पाटील,रेणुका ऱ्हाटोळकर,अश्विनी पाटील,सारिका पाटील,माधुरी पाटील यांची निवड करण्यात आली . यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील,सुधीर पाटील,ईश्वर पाटील,स्वीकार पाटील,कार्तिक पाटील,राजू पाटील,किशोर हेब्बाळकर, अंगणवाडी शिक्षिका वैष्णवी पाटील,सहायिका महादेवी सुतार,अन्नपूर्णा पाटील आदी उपस्थिती होते. शिक्षक श्री. प्रकाश देसाई यांनी सर्वांचे स्वागत व अभिनंदन केले.