- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध खानापूर हिंदू नगर येथील रहिवासी भटजी नरसिंह भट वय 60 यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.
- खानापूर हिंदू नगर येथील रहिवासी व मुळचे यल्लापुर तालुक्यातील असलेले तालुक्यातील हलसी येथील श्री नरसिंह मंदिराचे पुजारी म्हणून अनेक वर्षे सवा बजावून ते खानापूर येथे काही वर्षापासून स्थायिक होते. गेल्या दोन महिन्यापासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते.
- नरसिंह भटजी हे एक प्रसिद्ध भटजी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी खानापूर तालुक्यात एक शास्त्रोक्त पद्धतीने वास्तुशांती, गण होम तथा लक्ष्मी देवी यात्रा उत्सवात देवींचा विवाह सोहळा, धार्मिक विधी मुंजीवंदन आधी कामात त्यांचा हातखंडा होता. तालुक्यातील निम्म्याहून अधिक मंदिरांच्या धार्मिक विधी त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या भटजी कामात कौशल्य दाखवत अनेकावर छाप टाकली होती. त्यामुळे एक नामांकित भटजी म्हणून त्यांची परिस्थिती होती. त्यांचा अंत्यसंस्कार सायंकाळी सहा वाजता खानापूर येथे होणार आहे.