खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: ग्रामीण भागातील शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे. मातृभाषेतील शिक्षणाबरोबर बालकांच्यात आकलन शक्ती निर्माण व्हावी. मुलांना प्रोत्साहन तथा उत्तम शिक्षण प्राप्त मिळावे यासाठी बेळगाव लोककल्प फाउंडेशनने खानापूर तालुक्यात 36 शाळांना दत्तक घेऊन शाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न हाती घेतला आहे. लोककल्प फाउंडेशन ही संस्था शिक्षणाचा पायाभूत दर्जा तसेच समाज सुधारण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने क्रम हाती घेते. तरुण भारतचे समूह सल्लागार तथा लोकमान्य ट्रस्टचे संस्थापक किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तथा लोक कल्पच्या प्रमुख सौ मालिनी बाली यांच्या प्रदीर्घ विचारातून लोककल्प फाउंडेशन ही संस्था आज सीमा भागातही पर प्रांतातही कार्यरत आहे. अशा या फाउंडेशनच्या वतीने खानापूर तालुक्यातील अनेक शाळांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून चापगाव येथील शाळांना लोककल्प फाउंडेशनने दत्तक घेऊन या शाळांचा दर्जा सुधारण्याचे काम हाती घेतले आहे. चापगाव येथील मराठी प्राथमिक, कन्नड प्राथमिक तथा दक्षिण मराठी शिक्षण मंडळ संचालित मलप्रभा हायस्कूल साठी ग्रीन बोर्ड देणगी दाखल देऊन प्रोत्साहन देण्याचे काम केले असल्याचे विचार लोककल्प फाउंडेशनचे प्रवर्तक सुरजसिह रजपूत यांनी व्यक्त केले. मंगळवारी चापगाव येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेला 4 कन्नड प्राथमिक शाळेला एक, तथा मलप्रभा हायस्कूलमध्ये एक ग्रीन बोर्ड वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते.
मलप्रभा हायस्कूल मध्ये झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे तथा मराठी शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष मष्णू चोपडे होते.
यावेळी व्यासपीठावर लोककल्प चे संयोजक संतोष कदम, तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी विवेक गिरी, चापगाव ग्रामपंचायतचे सदस्य मारुती चोपडे, ग्रामपंचायत सदस्य नजीर सनदी, एसडीएमसीच्या उपाध्यक्ष नम्रता नारायण पाटील, तालुका रेशन दुकान संघटनेचे अध्यक्ष महादेव दळवी, निवृत्त सैनिक संजय बेळगावकर, एसडीएमसी महादेव पाटील, यल्लाप्पा पाटील, गजानन पाटील कन्नड शाळेचे मुख्याध्यापक मादीगार, आदी उपस्थित होते.
मराठी प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक महेश कवठणकर यांनी उपस्थित यांनी स्वागत केले. त्यानंतर लोककल्प फाउंडेशनच्या प्रवर्त्यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलांवर फोटो पूजन झाले. व फीत कापून ग्रीन बोर्डचे वितरण करण्यात आले. व शाळेच्या मुलींनी स्वागत गीत गायीले.
मलप्रभा हायस्कूल साठी एक ग्रीन बोर्ड!
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मलप्रभा हायस्कूल साठी देखील लोककल्प फाउंडेशन च्या वतीने एक ग्रीन बोर्ड देण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे होते. यावेळी त्यांनी लोककल्प फाउंडेशनने दिलेल्या सहकार्याबद्दल व मातृभाषेतील शाळा टिकवण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाबद्दल लोककल्प फाउंडेशनची कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थिताचे स्वागत मुख्याध्यापक पी.बी. पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना विवेक गिरी म्हणाले, मातृभाषेतील शाळा टिकल्या पाहिजेत. भाषा व संस्कृती टिकली तरच आपला समाज टिकणार आहे यासाठी शाळेच्या पटसंख्या वाढीबरोबर शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे यासाठी लोककल्प फाउंडेशनने घेतलेला उपक्रम हा कौतुकासच पात्र आहे. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. संतोष कदम यांनीही लोककल्प फाउंडेशनच्या कार्याबद्दल तथा लोक मान्य फाउंडेशन व तरुण भारत समूहाच्या वतीने हाती घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली.