IMG_20240619_212330

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं आहे. ड्रोनच्या माध्यमातून आठ मिनिटात एक एकरावर फवारणी होते. त्यासोबतच कीटकनाशकाची बचतही होते. अशा ड्रोन कॅमेरा अंतर्गत ऊस पिकावर तसेच भात पिकावर औषध फवारणी करण्यासाठी भाडेतत्त्वावर मिळत आहेत. खानापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी आशा उपक्रमाना प्राधान्य दिले जात आहे. गुरुवारी तालुक्यातील लैला शुगर कारखान्यावर आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या मार्ग सूची नुसार इपको कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ड्रोन च्यां साह्याने औषध फवारणी कशी करता येते याची प्रत्यक्ष ते दाखवण्यात आली . इफको खत कंपनीच्या वतीने प्रात्यक्षिक करण्यात आली. इफको कंपनीने अलीकडे नॅनो युरिया, नॅनो डीएपी, साकारिका अशी फवारणी करणारी औषधी उत्पादित केले आहेत. याला केंद्र सरकारने अद्विकृत परवाना दिला आहे. या फवारणी खतांना चांगली मागणी आहे. यावेळी कंपनीच्या वतीने सदर ड्रोन भाडेतत्त्वावर देण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी बुकिंग करण्याचे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी आजच बुकिंग करा व त्यासाठी 9599803002 या क्रमांकावर मिस कॉल द्या. असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले. यावेळी कंपनीच्या संयोजकांनी ड्रोन शेतकऱ्यांना कशा पद्धतीने माफक दरात भाडेतत्त्वावर फवारणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते, याची माहिती दिली व त्याची प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी लैला साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील, लैला कारखान्याचे संचालक चांगाप्पा निलजकर, बाळगौडा पाटील कर्मचारी महेश वागळेकर, देसाई तसेच कारखान्याचे कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीवरती मोठ्या संख्येने नागरिक रोजगारासाठी अवलंबून आहे. मात्र, यामध्ये पारंपारिक शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागतं.आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करण्याला प्राधान्य देत आहे. शेतामध्ये पिकांवर फवारणी करण्यासाठी पाठीवर पाच-दहा किलोचं फवारणी यंत्र घेऊन संपूर्ण शेत पालथा घालून पिकांवरती फवारणी करावी लागायची. यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ लागायचा आणि शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. यावर पर्याय म्हणून ….. यांनी ड्रोन द्वारे फवारणी करता येणारे यंत्र खरेदी केलं आहे.

ड्रोन ची वैशिष्ट्य….

इफको कंपनीच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या या फवारणी ड्रोन या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे आठ मिनिटांमध्ये हे यंत्र एकरभर पिकांवरती औषध फवारणी करू शकते. त्यासोबतच पिकांवर फवारणी केलं जाणार औषध कीटकनाशक याची देखील याच्यामध्ये बचत होते. जुने यंत्र घेऊन काम करताना शेतकऱ्यांना विषबाधा होत असे मात्र ड्रोन द्वारे हा धोका टाळता येतो. एका जागेवर उभे राहून एक किलोमीटर अंतरावर ती फवारणी करता येते.एकरभर शेतासाठी दहा लिटर पाणी लागते आणि यात ४० टक्के कीटकनाशकाची बचत होते. ड्रोन फवारणी यंत्राच्या माध्यमातून औषध फवारणी सोपी झाली आहे. पावसाळ्यात पाणी शेतात साचल्यानंतर फवारणी करताना चिखलात पाय खसतात मात्र ड्रोन द्वारे फवारणी केल्यामुळे शेतकऱ्याला काम करणं सोपं जातं. जुने यंत्राच्या तुलनेत यामध्ये वेळ कमी लागतो. असे त्यांनी यावेळी सांगितलं.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us