खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- खानापूर शहरालगत असलेल्या हलकर्णी ग्रामपंचायतीचा कारभार म्हणजे बे- बरोसे झाला आहे. गावापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या खानापूर शहरांमध्ये स्वच्छ रस्ते व निर्मल योजना राबवण्यासाठी विशेष क्रम घेतले जातात. खानापूर शहरात नोकरी व्यवसायानिमित्त बहुसंख्येने स्थायी असलेल्या हलकर्णी गावात मात्र अनेक समस्यांचा डोंगर निर्माण झाल्याचे दिसून येते. हलकर्णी गावांमध्ये जल मिशन योजना राबवण्यासाठी काढण्यात आलेल्या चरी, गेली दोन वर्षे बुजवण्यात आल्या नाहीत. काम अर्धवट आहे. नळाला पाणी नाही, कंत्राटदार गायब अशी परिस्थिती या योजनेची झाली आहे. त्यामुळे गावात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज निर्माण झाले आहे पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायती च्या अडचणीकडे गांभीरणे लक्ष देईल का? असा प्रश्न गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. जल जीवन मिशनचे काम कंत्राटदाराच्या बेजबाबदारीपणामुळे अर्धवट राहिले आहे. ही एक जमेची बाजू झाली, तरी ग्रामपंचायत क्षेत्रातील गटारी स्वच्छ करण्याकडे ग्रामपंचायतीचे साप दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. गावातील मुख्य रस्त्यावर दुतर्फा गवत वाढल्याने गावातील समस्या दिसून येते. गावात ग्रामपंचायत आहे. मात्र या ग्रामपंचायतीचे विकासाकडे मात्र साप दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत गावातील या भरीव समस्यावर गांभीर्याने लक्ष देईल का? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
दुर्गंधीचा सामना ! डेंगू चा प्रादुर्भाव!
घंटागाडी ग्रामपंचायतच्या दारात! कचरा नागरिकांच्या घरात!
- निर्मल योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला घंटागाडी देण्यात आली आहे. या घंटागाडीला चालवण्यासाठी विशेष तरतूदही करण्यात आली आहे. प्रत्येक घराला दोन बकेट वितरीत करण्यात आले आहेत. यामध्ये सुका कचरा व ओला कचरा अशी विल्हेवाट करण्याची सूचना ग्रामपंचायतीने दिली आहे. परंतु घंटागाडी ग्रामपंचायतच्या दारात, कचरा नागरिकांच्या घरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी घरात साचलेला कचरा गावकऱ्यातील उघड्या जागेवर टाकण्यात येत आहे. प्लास्टिकचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक ठिकाणी गटारी तुडुंब होत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पासून रोगाला व दुर्गंधीला सामना करावा लागत आहे. याची दखल ग्रामपंचायत घेईल का असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
खानापूर शहरात डेंगूचा प्रादुर्भाव! पण ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष!
- खानापूर शहर परिसरात अलीकडे डेंगू या भयानक रोगाचा प्रभाव वाढला आहे अनेक अल्पवयीन मुले किंवा वर्ग या आजाराला घेरले असून खानापूर शासकीय रुग्णालयात शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. शिवाय खाजगी रुग्णालयातही अनेक रुग्णांचा आकडा वाढल्याने खानापूर शहर सध्या रेड झोन वर आहे. खानापूर शहर परिसरात डेंगूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने गांभीर्य घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. खानापूर शहर परिसरात त्याचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याला दुर्गंधी व वाढत्या डासांचा प्रादुर्भाव हे कारण म्हणावे लागेल यासाठी हलकर्णी ग्रामपंचायत गाव परिसरात स्वच्छता अभियान राबवून निर्मला ग्राम करण्यासाठी प्रयत्न करेल का. सद्य परिस्थितीत खानापूर तालुक्याला न्यायंगाची बाजू देणाऱ्या कोर्टाच्या बाजूला कचऱ्याचे साचलेले ढीग गांधीनगर परिसरात एक आव्हानच ठरले आहे, शहरांतर्गत महामार्गाच्या बाजूला रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेली दुर्गंधीयुक्त परिस्थिती ही अनेक रोगांना आव्हान देणारी आहे. यासाठी याकडे कोण लक्ष देईल ? असा प्रश्न या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. कचरा टाकण्यात आलेली ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची नाही. या जागेवर महसूल खात्याचा अधिकार आहे हे जरी खरे असले तरी गाव परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलून किमान स्वच्छता अभियान राखावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी व्यक्त केली जात आहे.