खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर येथील सुप्रसिद्ध वकील व खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड आय. आर. घाडी यांच्या धर्मपत्नी सौ पार्वती घाडी यांना “राष्ट्रीय समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या त्यांच्या मानांकनाबद्दल पार्वती घाडी तसेच तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी यांचेही अभिनंदन होत आहे.
खानापूर येथील घाडी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सौ पार्वती ईश्वर घाडी यांना हा “राष्ट्रीय समाज भूषण” पुरस्कार प्राप्त झाला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या शुभहस्ते गोवा येथे एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला. सौ. पार्वती घाडी एक अत्यंत उत्तम गृहिणी तसेच महिला व बेटी बचाव विषयक सामाजिक कार्यामध्ये नेहमी त्या कार्यतत्वावर राहिले आहेत. त्यांची या कार्याची दखल घेऊन नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव तथा हेल्थ अँड डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुष व महिला तसेच उत्तम अधिकारी यांना असे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते, याच पद्धतीने 2024 या वर्षातील हा पुरस्कार सदर संस्थेच्या वतीने खानापूर तालुक्यातून सौ पार्वती घाडी यांच्या सामाजिक बांधिलकीची जाण व दखल घेता त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार वितरण प्रसंगी ऍड ईश्वर घाडी, फाउंडेशनचे पदाधिकारी उगेंद्र जाधव, हेमलता शिंदे, सावित्री माने, सुजाता पटोले, शांता यादव, साक्षी थोरात आदी उपस्थित होते. त्यांच्या या अभिनंदनीय निवडी बद्दल त्यांचे कौतुक होते .