Screenshot_20240520_095758

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

गेल्या चार दिवसापासून वादळी व अवकाळी पावसाने सर्वत्र ओलावा केला आहे. मान्सून पूर्व शेती मशागतींच्या कामासाठी सध्या सुरू असलेला वादळी पाऊस हा अत्यंत लाभदायक आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने त्रासलेला बळीराजा सुखावला आहे. पण गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू असलेल्या जोराच्या वादळी पावसामुळे नुकसानही होताना दिसत आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे सर्वत्र ओलावा झाला मात्र खानापूर शहरातील बाजारपेठेत यचा चांगलाच परिणाम झाला. रविवारी खानापूरची बाजारपेठ भरगच्च भरली होती अचानक पणे सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावर मांडलेल्या पालेभाज्या, बटाटे, कांदे रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यातून वाहून जाताना दिसत होते त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचा चांगलाच फटका बसला. अचानक जोराचा पाऊस झाल्याने रस्त्यावर बसलेल्या व्यापाऱ्याना मांडणी केलेला पालेभाज्या सावरता सावरता जोराचा पाऊस सुरू झाला व गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाणी आले व त्या रस्त्यातून पालेभाज्या वाहून गेल्याने अनेक व्यापाऱ्यचे मोठे नुकसान झाले.

  • चापगाव: येथे अभिलाषा , सुपरमन शुभांगी, अमन, साईराम, सफल इंद्रायणी, अंकुर सोनम, अमोग, चिंटू कावेरी, कर्नाटका इंद्रायणी, महाराष्ट्र इंद्रायणी, युएस 312, ओम साई, ओमकार, एम पी 125, अंकुर श्री, दप्तरी, सौभाग्य अशी विविध प्रकारची भात बियाणे माफक दरात मिळतील/////

सध्या सुरू असलेला वादळी पाऊस सर्वत्र जोरात सुरू आहे एकीकडे मान्सूनची चाहूल निर्माण झाल्याने आता बळीराजा सुखावला आहे मान्सूनपूर्व मसागतीच्या कामासाठी सध्या सुरू असलेला पाऊस हा अत्यंत लाभाचा ठरला त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी पावसाने शेतकरी वर्गाला चांगले हंगाम दिले आहे. आता शेतीतील ओलावा कमी होताच पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात होणार त्यामुळे यावर्षी ओलिताखाली भात पेरणी होण्याची शक्यता अधिक असून शेतकरी वर्ग बी बियाण्याच्या शोधात आहेत.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us