खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायतच्या मनरेगा निधीतून मंजूर झालेल्या ग्रामपंचायत इमारत बांधकाम वरून ग्रामपंचायत अध्यक्ष व एका सदस्यात आरोप – प्रत्यारोपाचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने एक चर्चेचा विषय बनला आहे. या ठिकाणी मनरेगा निधीतून मंजूर झालेल्या 20 लाखाच्या निधीतून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामातील स्लॅब साठी वापरण्यात येणारे लोखंड हे आराखड्यानुसार तसेच अभियंत्यांच्या मार्ग सूची प्रमाणे केले जात आहे. असे असताना ग्रामपंचायत सदस्य रणजीत पाटील यांनी सदर कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करून व्हिडिओ व्हायरल केला आहे.
- या विरोधात ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांनी केलेला आरोप चुकीचा असून स्वतः ग्रामपंचायत सदस्य या नात्याने त्यांनी या कामाकडे लक्ष देणे गरजेचे असताना केवळ राजकीय स्वार्थ व आकसापोटी हा आरोप करत असून या विरोधात आपण मानहानीचा दावा ठोकू असा इशाराही त्यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे.
- याबाबत व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून मिळालेली माहिती की, हलगा ग्रामपंचायतच्या 20 लाखाच्या निधीतून सदर इमारतीचे काम सुरू आहे. सदर काम एका ठेकेदाराला मिळाले असून या कामावर ग्रामपंचायत सदस्यसह सदस्यांचे लक्ष असणे गरजेचे आहे. दोनच दिवसांपूर्वी साठी लोखंडी जाळ्या बांधणीचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सदस्य रणजीत पाटील यांनी गेलेल्या व्हिडिओ नुसार सदर स्लॅब भरणीसाठी 5 इंचावर 8 एमएम चे बार वापरले जात आहेत हे चुकीचे आहे. वास्तविक 10 एमएम चे बार वापरणे गरजेचे असताना 8 एमएम चे बार वापरून यामध्ये अध्यक्ष भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लोखंडी कामात निष्कृष्ट दर्जाचे काम दिसून आल्याने आपण आवाज उठवताच 10 एमएम चा बार वापरून पुन्हा जाळी भक्कम करण्याचे काम पुन्हा सुरू झाले असल्याचा दुसरा व्हिडिओ ही त्यांनी व्हायरल केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपावरून ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील व इतर काही सदस्यांनी या कामा संदर्भात आपला खुलासा तातडीने दिला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सदर ग्रामपंचायतीच्या इमारतीचे काम हे पंचायत समितीच्या ठरावातून हाती घेण्यात आले आहे. आणि यासाठी निविदा मागवण्यात आली असून बेळगाव येथील लक्ष्मी एजन्सीला देण्यात आले आहे. सध्या इमारतीचे निम्मे काम झाले असले तरी संपूर्ण काम पूर्ण होईल तोपर्यंत संबंधित कंत्राट झाला एक रुपयाही देण्यात आला नाही. शिवाय स्लॅब साठी वापरण्यात येणारे लोखंड व जाळी ही अभियंत्यांच्या मार्ग सूची प्रमाणे केली जात आहे. या कामावर देखभाल करणारे अभियंते असताना ग्रामपंचायती भ्रष्टाचारी कसा होऊ शकतो. वास्तविक इमारतीचे काम हे सर्व सदस्यांनी उभा राहून चांगल्या पद्धतीचे करून घेणे गरजेचे असताना केवळ राजकीय स्वार्थ व ग्रामपंचायतचा अपमान करण्याच्या दृष्टिकोनातून रणजीत पाटील यांनी हा व्हिडिओ व्हायरल करून केवळ आपल्या मोठेपणासाठी व प्रसिद्धीसाठी केलेला अट्टाहास आहे. यावर तालुक्यातील जनतेने कोणीही विश्वास ठेवू नये. ग्रामपंचायत इमारतीचे काम व्यवस्थित सुरू असताना रणजीत पाटील यांनी अशा पद्धतीने ग्रामपंचायत अध्यक्ष वर भ्रष्टाचाराचा आरोप लावणे हे चुकीचे असून एक-दोन दिवसात रणजीत पाटील यांनी यासंदर्भात खुलासा देऊन माफी मागितली नाही तर मी मानहानीचा दावा त्यांच्यावर ठोकू असा इशाराही ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांनी आपल्या व्हिडिओद्वारे केला आहे.