- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- खानापूर तालुक्याच्या निलावडे भागात एका टस्कराने गेल्या 15 ते 20 दिवसापासून ठाण मांडले आहे. सदर हत्तीने कबनाळी सह कोंगळा भागातील वांयांगण पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान अवलंबले आहे. सदर तस्कर दिवसाढवळ्या उभ्या वांयगण भात पिकामध्ये बिनधास्तपणे नासाडी करत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून कबनाळी परिसरात हत्तीने केलेल्या नुकसानाची भरपाई वन खात्याने अद्याप दिली नाही. दुसरीकडे त्या हत्तीला हुसकावण्यासाठी वन खातेही हतबल झाले आहे. सध्या त्या हत्तीने आपला मोर्चा मादाईच्या खोऱ्यातून कोंगळा परिसरात वळवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जंगलाच्या पट्ट्यात जेमतेम असलेली जमीन त्यामध्ये वांगण पिकावर येथील नागरिक अवलंबून असतात. तेच पीक आता त्या हत्तीने फस्त करण्यास सुरुवात केल्याने आता उपजीविका कशी जगावे असा प्रश्न तेथे नागरिकांच्या समोर आला आहे. दरम्यान आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कोंगळा गावाला धावती भेट देऊन येतील भात पिकांची पाहणी केली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सदर हत्ती या भागातून हुसकावण्या साठी प्रयत्न करावेत व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सदर वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान गावातील प्रमुख पंच कमिटीची चर्चा करून या भागातील समस्या विषयी आमदार विठ्ठल हलगेकर चर्चा केली आहे.
वनखाते हतबल!
- सदर हत्ती या भागात ठाण मानून बसला आहे. कबनाळी तसेच कोंगळा या दोन्ही गावाच्या मध्ये महादाई नदी आहे या ठिकाणी सदर हत्तीला पूरक पाणी व जंगल असल्याकारणाने केल्या 15 ते 20 दिवसापासून या ठिकाणी त्या हत्तीने ठाण मांडले आहे. जेमतेम वांगं पिकाची जमीन चौफेर जंगल असल्याने या ठिकाणाहून हत्तीला उसकावणे कठीण झाले आहे त्यामुळे वन कातेही हतबल झाले आहे. हत्तीला केवळ दुरून बघण्या व्यतिरिक्त त्याला काहीही करणे शक्य नाही. पिकात घुसलेल्या हत्तीला हुसकावण्यासाठी येथील नागरिक काटेकोर प्रयत्न करत आहेत पण काही केल्या हत्ती या भागातून बाहेर जाईना त्यामुळे येथील नागरिकांची तर गोची झालीच आहे शिवाय वन खातेही हतबल झाले आहे.