IMG_20240503_082321

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:

  • गेल्या 70 वर्षात काँग्रेस पक्षाने देशाला समृद्ध बनवण्याचे काम केले आहे. स्वातंत्र्यापासून प्रत्येक गोरगरिबांच्या हातात काम देण्याचे काम, कसणाऱ्यांना जमिनी मिळवून देण्याचे काम, रोजंदारी सह जगण्याची ताकद काँग्रेस पक्षाने देशाला मिळून दिली आहे असे असताना केवळ दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने देशाला समृद्ध बनवण्याचा सुरू केलेला कांगावा हा केवळ बनाव आहे. सध्या मोदी पॅटर्न व्यतिरिक्त दुसरा कोणताच मुद्दा भाजप पक्षाकडे नाही. योजना सांगितल्या जातात पण गरिबापर्यंत कधी पोहोचल्यात का? याच उदाहरण भाजपा देऊ शकत नाही. मात्र काँग्रेस पक्षाने आतापर्यंत जे जे वचन मतदारांना दिले आहे ते पाळण्याचे काम केले आहे. 2023 च्या निवडणुकीत दिलेल्या गॅरंटी योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळण्याचे काम काँग्रेसने केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा केवळ तोंडामध्ये राम म्हणून चालत नाही तर तो काम देऊन चालवतो. यासाठी खानापूर तालुक्यातील मतदारांनी सरकारच्या गॅरंटी योजना सह तालुक्यात माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केलेला कार्याचा गौरव लक्षात घेता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांच्या पाठीशी समस्त मतदारांनी रहावे व आपल्या भागाचा विकास करून घ्यावा असे आवाहन तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष व वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी काटगाळी येथे झालेल्या प्रचार सभेत बोलताना सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत तालुका महिला ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अनिता दंडगल सामाजिक कार्यकर्ते महादेव घाडी, नारायण सावंत आदी उपस्थित होते.
  • यावेळी बोलताना महादेव घाडी म्हणाले, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा समाजाला तारणारा पक्ष आहे. या पक्षाने देशाला समृद्ध बनवण्यासाठी सत्तर वर्षे घालवली. स्वर्गीय इंदिरा गांधी, राजीव गांधी सारख्या महान नेतृत्वाने देशासाठी आपला जीव बलिदान दिला. कसणाऱ्यांना जमिनी, सह आणि एक चांगले पॅटर्न आतापर्यंत देशात राबवले आहेत. कर्नाटक सरकारने दिलेल्या वचनाप्रमाणे गॅरंटी योजना अंतर्गत अनेकांना लाभ मिळवून दिला आहे. त्यातच डॉक्टर अंजली निंबाळकर सारख्या एक उच्च शिक्षित महिला आज लोकसभेच्या उमेदवार म्हणून आपल्या उत्तर लोकसभा मतदारसंघात लाभलेले आहेत उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसला वाढता पाठिंबा असल्याकारणाने त्यांचा विजय हा निश्चित आहे. खानापूर तालुक्यामध्ये माजी आमदार म्हणून काम केलेल्या डॉक्टर अंजलीताई निंबाळकर ह्या परक्या परप्रांतीय म्हणून खानापूर तालुक्यातील नेते गरळ ओकत आहेत. हे चुकीचे आहे. लोकसभेच्या राजकारणात देशातील कोणीही व्यक्ती कोणत्याही ठिकाणी निवडणुका लढू शकतो. हे जरी खरे असले तरी डॉक्टर अंजली निंबाळकर या खानापूरच्या स्थायिक नेते असल्याकारणाने त्यांना परक्या म्हणण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नाही. यासाठी हक्काने आपल्या माणसाजवळ उद्या दाद मागण्यासाठी जवळचा खासदार होणे गरजेचे आहे. डॉक्टर अंजली निंबाळकर ह्या तालुक्याच्या विकासासाठी नक्कीच भर देणार यात शंका नाही यासाठी तमाम जनतेने काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉक्टरांचे निंबाळकर यांना भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. महिला ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अनिता दंडगल यांनीही घरोघरी जाऊन मतदारांच्या महिलांच्या गाठीभेटी घेतल्या व डॉक्टर अंजली निंबाळकर यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनीही केले.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us