- खानापूर : व्हराडी ट्रकने ठोकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना खानापूर जांबोटी रस्त्यावरील सणाया फार्म्स (बाचोली कत्री) नजीक गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. यामध्ये दुचाकीवरील अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
- याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील शिवठाण येथील युवक विदेश तुकाराम मिराशी (वय 28) हा आपल्या मित्रासह शुभम गार्डन येथील एका लग्न समारंभासाठी एक्टिवा दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका व्हराडी ट्रकने ठोकल्याने दूचाकी स्वारक् जागीच ठार झाला. पाठीमागील त्याचा मित्र बाजूला उडून पडला. ट्रकने ठोकल्याने दुचाकी एक्टिवा स्वारक विदेश तुकाराम मिराशी रस्त्यावरच पडल्याने ट्रकचे चाक कमरे खालून गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. तेथील नागरिकांनी त्याला ताबडतोब खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल केले. पण दवाखान्यात आणण्यात पूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली होती
- सदर ट्रक, एका लग्नाचे वऱ्हाड घेऊन, लग्नकार्यासाठी जात असल्याचे समजते. अपघात होताच, ट्रक चालकाने ट्रक न थांबवताच तसाच पुढे निघून गेल्याचे समजते. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून, पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत.
- सदर अपघाताचे वृत्त समजतात खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी दवाखान्याकडे धाव घेतली व सदर मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले असून, पोलिसांना व डॉक्टरांना पंचनामा व कायदेशीर बाबी लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. खानापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.