- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : कर्नाटकातील मराठा समाजाला नेहमी राष्ट्रीय पक्षांनी दाबण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय पातळीवर असलेल्या बलाढ्य मराठा समाजातील नेत्यांना दुजाभावाची भूमिका देण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केली आहे. आता अनेक वर्षाच्या मराठा समाजाच्या मागणीनंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रातून खानापूरच्या माजी आमदार तथा एक मराठा नेतृत्वाला उमेदवारी देऊन मराठा समाजाला तुमची ताकद दाखवा असा जणू संदेशच दिला आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजासाठी आलेली ही संधी आज उत्तर कर्नाटक लोकसभा मतदारसंघतील मतदाराने गमावू नये आज मराठा समाजाच्या सामाजिक व राजकीय अस्तित्वाची ही लढाई असून यासाठी प्रत्येक मराठा समाजाने एकसंघ होऊन डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना भरघोस मताने निवडून आणावे असे आवाहन कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा परिषदेचे युथ अध्यक्ष रोहित साठे यांनी व्यक्त केले. शनिवारी रोहित साठे व मराठा परिषदेचे काही पदाधिकारी खानापूर सह दांडेली दौऱ्यावर प्रचारासाठी आले असता खानापूर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
- प्रारंभी अँड ईश्वर घाडी यानी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले. पत्रकार परिषदेला कर्नाटक मराठा क्रांती मोर्चा संघटनेचे संघटक नारायण गणेश , संभाजी ब्रिगेडचे सतीश सुर्यवंशी, हरिष निंबाळकर, नितीन पवार, रायबा जाधव, क्षत्रिय मराठा परिषद बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, रमेश पाटील,सिताराम बेडरे, आदी उपस्थित होते.
- यावेळी बोलताना अँड ईश्वर घाडी म्हणाले की, आज उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अंजली निंबाळकर यांना वाढता पाठिंबा लक्षात घेता काँग्रेसचा विजय हा निश्चित आहे अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण मराठा समाजाने आज एक संग होऊन त्यांचे मताधिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणे ही जबाबदारी आहे. विरोधक परप्रांतीय किंवा काँग्रेस पक्षाच्या योजनांवर करत असलेल्या टीका ह्या शोभणाऱ्या नाहीत. मराठी समाज्यातील पहिल्यांदाच कारवार लोकसभा मतदार संघातुन खानापूरच्या माजी आमदार डाॅ अंजली निंबाळकर याना खासदारकीसाठी उमेदवारी देऊ केली. याचा अभिमान बाळगुन खानापूर तालुक्यातील मतदार बंधुनी भरघोस मतानी निवडून द्या असे आवाहन केले.
- बिदर मराठा क्रांती मोर्चाचे संघटक एडवोकेट नारायण गणेश म्हणाले, कर्नाटक राज्यात क्षत्रिय मराठा समाज्याच्या डाॅ अंजली निंबाळकर याना कारवार लोकसभा मतदार संघातुन पहिल्यांदाच महिला उमेदवार म्हणून निवडले आहे. त्यामुळे या संधीचे सोन करून डाॅ.अंजली निंबाळकर याना प्रचंड मतानी निवडुन द्या.असे आवाहन केले.
- यावेळी क्षत्रिय मराठा बेळगाव जिल्हा दिलीप पवार ,नितीन पवार, सतीश सुर्यवंशी आदीनी विचार मांडले.
- यावेळी खानापूर तालुक्यातील संजय भोसले, रमेश पाटील, सिताराम बेडरे, प्रमोद गुंजीकर, सुनिल पाटील, प्रकाश गावडे,ज्ञानेश्वर गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.