- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: गेल्या अनेक दिवसापासून क** उनाने तापलेल्या शेतकरी वर्गाला वरून राजाने दिलासा दिला आहे. चापगाव ,कोडचवाड , पारिषवाढ, भागात सकाळपासूनच जोराचा वादळी वारा सह पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून उन्हाने तापलेल्या उन्हाळी पिकांना याचा चांगलाच दिलासा मिळाला पण सुसाट वादळीवारा व वीज कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
- सकाळी आठ वाजल्यापासून तब्बल तासभर जोराचा पाऊसही झाला त्यामुळे सर्वत्र चांगलाच ओलावा झाला शेती पिकांना व उन्हाळी पिकांना याचा चांगलाच लाभ होणार आहे पण सुसाट वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाल्याने अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागले.
चापगाव पिकेपीएस गोदामाचे पत्रे उडाले!
- चापगाव येथील प्राथमिक कृषीपतिन सहकारी संघाच्या खत गोदामाचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिणामी गोदामातील खतसाठा पावसामुळे भिजला आहे. शिवाय अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. गावातील लक्ष्मीगदगे जवळ असलेल्या ट्रांसफार्मर वरही झाड तुटून पडल्याने ट्रांसफार्मर चे खांब तुटल्याने सकाळपासून ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम हेस्कॉम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांचे शेतातील शेड ही वाऱ्याने उडून गेल्याने नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एकूणच शनिवारी सकाळी या भागात झालेला पाऊस हा शेतकऱ्यांना दिलासा दिलाना असला तरी अनेकांचे घरांचे पत्रे उडून गेल्याने नुकसानीलाही सामोरे जावे लागले आहे. सकाळी जोराचा पाऊस झाल्यानंतर पुन्हा सकाळपासून वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला. त्यामुळे अजूनही पावसाची शक्यता नाकारता येत नाही.