खानापूर (प्रतिनिधी); खानापूर तालुक्यातील हालसी जवळील भांबर्डा येथे नव्याने जीर्णोद्धारित करण्यात येत असलेल्या श्री कलमेश्वर मंदिराचा चौकट पूजन कार्यक्रम गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार मंगळवार दि. 9 रोजी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अनुषंगाने या मंदिरासाठी सुसाज्याची चौकट बनवण्यात आली असून या चौकटीचा मिरवणूक कार्यक्रम रविवारी पार पडला. तालुक्यातील कोडचवाड च्या येथील कारागिराकडून बनवण्यात आलेली ही चौकट विविध मार्गावरून खानापूर ते नंदगड मार्गे हलसी भांबर्डा येथे आणण्यात आली आहे.
राजधानी (पलासीका) हलशी गावचे मजरे असणाऱ्या भांबर्डे येथे लाखो रुपये खर्चुन या मंदिराची उभारणी करण्यात येत असून, गुडी पाडव्याच्या निमित्त चौकट पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. गावच्या नैऋत्येला हे पौराणिक मंदिर चिरा दगडात उभे होते. मंदिर परिसरात शेष मूर्ती, श्री लक्ष्मी, व विविध अवतार सात व दहा, देव देवतांच्या मूर्ती कोरलेली शिल्पे, वीरगळ, मूर्तीचे दगड आदी पौराणिक विविध अवतार सात व दहा, देव देवतांच्या मूर्ती कोरलेली शिल्पे, वीरगळ, मूर्तीचे दगड आदी पौराणिक शिल्पेही पहावयास मिळतात. कलमेश्वर (कलेश्वर) मंदिराची पूजा सातवाहन घराण्याच्या कालखंडात (ख्रिस्तपूर्व 230 ते 237) करत असल्याचे शीला लेखानुसार दिसते.