खानापूर- ख्यातनाम संपादक आणि आयटी क्षेत्रातील प्रमुख अधिकारी तसेच प्रेरणादायी वक्ते डॉ. उदय निरगुडकर यांचे व्याख्यान खानापुरातील शांतिनिकेतन शाळेचे विद्यार्थी व पालक यांच्यासाठी होणार आहे. बुधवार दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शांतिनिकेतन स्कूल मध्ये “बॉर्न टू विन” विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम खास पालक आणि विद्यार्थ्यांच्या साठी आयोजित करण्यात आला आहे . कार्यक्रम सर्वांना खुला असून वेळेवर सुरू होईल याची कृपया नोंद घेऊन विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे ही विनंती
झी २४ तास, न्युज १८ लोकमत या वृत्तवाहिन्यांचे तसेच DNA या वृत्तपत्राचे यशस्वी संपादक असलेले डॉ. निरगुडकर हे अनेक IT कंपन्यांत CEO या पदावर कार्यरत होते. एक संशोधक, शिक्षण तज्ज्ञ , अर्थ तज्ज्ञ आणि शास्त्रीय संगीताचे जाणकार मुलाखतकार म्हणून त्यांची वाणी अतिशय प्रेरणादायी, विद्यार्थ्यांना घडविणारी आहे .भारताचे पुढील पंचवीस वर्षांचे ते रंगवित असलेले चित्र तरुणांना मार्गदर्शक ठरणारे आहे . या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन शांतिनिकेतन स्कूल तर्फे करण्यात येत आहे.