खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातून खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढविणार असल्याने इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार आज खानापूर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष व शिव स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई व समितीचे सदस्य हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील या दोघांनी आपला अर्ज समितीकडे सादर केला आहे. खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई व सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला आहे.
यावेळी निरंजन सरदेसाई यांचा अर्ज भरण्यासाठी संदेश कोडचवाडकर, रमेश धबाले, रणजित पाटील, सुनील पाटील, मुकुंद पाटील उपस्थित होते तसेच रणजित पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी ग्राम पंचायत सदस्य हलगा पुंडलिक पाटील उपस्थित होते.
दरम्यान रविवारी दि. ७ एप्रिल सकाळी ११ वाजेपर्यंत इच्छुकांकडून अर्ज स्वीकारले जातील याची नोंद इच्छुकांनी घ्यावी असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.