खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
कर्नाटकात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर पाच गॅरंटी कार्ड देऊन जनतेला अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. जाहीर केलेली गॅरंटी कार्ड मुख्यमंत्री सिद्धरामय्या अर्थात काँग्रेस सरकार देणार नाही अशी खिल्ली विरोधकांनी उडवली होती. पण आमच्या सरकारने विरोधकांची झोप उडवली आणि योजना यशस्वीरित्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. उद्या केंद्रातही इंडिया अलायन्स सरकार अस्तित्वात आल्यानंतर पंच न्याय योजना अमलात आणण्याचा अजेंडा आमच्या पक्षाने केला आहे यामध्ये महिलांना न्याय, बेरोजगार युवकांना रोजगार, शेतकऱ्यांना न्याय अशा योजना देण्याची हमी दिली आहे. देशातील जनतेने कौल दिल्यास या योजना नक्कीच आपले सरकार यशस्वी करील असे विचार माजी मंत्री व हल्ल्याचे आमदार आर व्ही देशपांडे यांनी व्यक्त केले सोमवारी नंदगड येथे नंदगड जिल्हा पंचायत विभागीय कार्यकर्त्यांच्या सभेत त्यांनी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सीजी वाली होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात निधर्मी जनता दलातून अनेक वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसचे नेते लियाकत बिछनावर, एम एम सावकार , मन्सूर तहसीलदार, एम ए इनामदार, ए एम जगुभाई, इलियास पटेल, एस एस घालीमठ यासह अनेकांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना काँग्रेस उमेदवार माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपण खानापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून विकासाच्या दिशेने पाऊल टाकत आली आहे. या जनतेने मला एकदा आशीर्वाद दिला राजकारणात हार जीत ह्या गोष्टी असतात. गेल्या विधानसभेत तालुक्याने भाजपला प्रतिनिधित्व दिले. पण त्या अगोदर काँग्रेसलाही दिले आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवणारी जनता आहे. पण आमिषाला बळी पडून सत्तांतर झाले असले तरी आगामी काळात जनता काँग्रेसच्या चांगल्या कार्याला ओळखून असून येथे लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आपल्या ताईला निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने कंबर असावी व आपल्या भागाचा खासदार लोकसभेत पाठवावा विश्वासाला पात्र राहून आपण नक्कीच या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे भावनिक उद्गार कॅनरा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंबांना होसमणी, महांतेस राऊत, महादेव कोळी, मधु कवळेकर, संतोष हंजी,वैष्णवी पाटील, यासह अनेक जण उपस्थित होते.