डॉ.अंजली निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा! अनेक समिती नेत्यांची उपस्थिती!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुका हा गेल्या 70 वर्षात लोकसभा निवडणुकीत विकास करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहिला आहे. परंतु आजवरच्या इतिहासात खानापूर तालुक्यातून स्थानिक तथा मराठी उमेदवाराला कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे या भागाचा विकास खुंटला आहे. उत्तर कन्नड लोकसभा मतदार क्षेत्रात उर्वरित सर्व तालुके व जिल्हा केंद्र हे कारवारशी संबंधित असल्याने या भागातील उमेदवार दिला जात होता पण यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने खानापूरच्या माजी आमदार एक बहुभाषिक मराठी नेतृत्वाला शोभेल अशा विकसनशील नेत्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना उमेदवारी देऊन खानापूर तालुक्याची मान उंचावली आहे. याचीच जाण खानापूर तालुक्यातील बहुतांश मराठी भाषिकांनी तसेच इतर राष्ट्रीय पक्षांनी राखावी व व या भागाच्या विकासासाठी लोकसभेत आपला प्रतिनिधी पाठवावा यासाठीच खानापूर तालुक्यातून डॉ. निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा देऊन आपण तालुक्याचा विकास करूया, असे आवाहन समितीने नेते महादेव घाडी आमटे पिके पी एस चे चेअरमन लक्ष्मण कसरलेकर, शामराव पाटील आदीनी केले. जांबोटी जिल्हा पंचायत क्षेत्रात अंतर्गत प्रचार सभा हब्बनहटी जवळ सोमवारी सायंकाळी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण कसरलेकर होते.
या सभेत या भागातून जवळपास 700 हून अधिक कार्यकर्ते या भागातील अनेक राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते समितीने नेते , महिला प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमेदवार तथा माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या, खानापूर तालुका हा माझा तालुका आहे. या तालुक्यातील जनतेला मी गेली दहा वर्षे ओळखून आहे .या भागाचा विकास करण्यासाठी आपले सातत्याचे प्रयत्न आहेत. राजकारणात विजय , पराभव या दोन्ही गोष्टी असतात, याकडे लक्ष न देता तालुक्याने दिलेल्या प्रेरणेतूनच मी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर कन्नड जिल्ह्यातून उमेदवार म्हणून उभी आहे. खानापूर तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी आपण मागील सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून मला पुन्हा एकदा या लोकसभेच्या निवडणुकीत आपला प्रतिनिधी म्हणून निवडून द्यावा. व या भागाच्या विकासासाठी आपले पाठबळ द्यावे. असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.