खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी// लोंढा:
- कर्नाटकात काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन झाल्यापासून मतदारांना जी वचने दिली आहेत. ते पाळण्याची जबाबदारी हाती घेतली आहे. पाच गॅरंटी कार्ड अंतर्गत ज्या ज्या योजना अंमलात आणल्या आहेत, त्या यशस्वीरित्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. देशात गेल्या 70 वर्षात काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केले. पण अलीकडे पंतप्रधान मोदी सरकारने आपल्या काळात दिलेली वचने पाळले नाहीत. प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर 15 लाख रुपये देण्याची घोषणा हवेत जिरली आहे. पण काँग्रेस सरकारने आतापर्यंत जी जी हमी दिली आहे ती पूर्ण करण्याची जबाबदारी दिली असून या पुढील काळातही काँग्रेस सरकार सर्वसामान्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहील. आज देशात मतदार राजाने इंडिया सरकारला बहुमत दिले तर अनेक प्रभावी योजना राबवण्याची हमी दिली आहे. ती राबवण्यासाठी काँग्रेस सरकार कटिबद्ध राहील.
- आज उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला मिळत असलेला वाढता पाठिंबा मिळत आहे. असाच पाठिंबा आपल्या खानापूर तालुक्यातून आपल्या ताईसाठी पुन्हा एकदा जनतेने द्यावा. मी या भागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कटिबद्ध राहील असे भावनिक उद्गार लोंढा येथे आयोजित प्रचार सभेत डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी व्यक्त केले.
- उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रातून डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण भागातून पहिली प्रचार फेरी पूर्ण करून खानापूर तालुक्यातील दुसऱ्या प्रचार फेरीला आज लोंढा येथून सुरुवात केली. या सभेला हल्ल्याळ चे आमदार व माजी मंत्री आर व्ही देशपांडे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, मधु कवळेकर यासह लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रातील काँग्रेसचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
- यावेळी बोलताना माजी मंत्री आर. वी. देशपांडे म्हणाले, उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातन गेल्या पाच निवडणुकात आपण काँग्रेसला मागे ठेवून भाजप खासदारला निवडून दिले, पण त्या खासदारानी या भागाच्या विकाससाठी काय प्रयत्न केले, लोक संपर्क किती ठेवला, हे सर्वांनाच ज्ञात आहे. यामुळे त्यावर जास्त बोलणे योग्य नाही, पण काँग्रेस सरकारने कर्नाटकात सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या ज्या हमी योजना दिल्या आहेत, त्या पूर्ण केल्या असून देशात इंडिया सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह निरू उद्योगांना रोजगार ,प्रत्येक महिलांच्या खात्यावर एक लाख रुपये अशा अनेक हमी योजना आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी इंडिया सरकार कटिबद्ध राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रातील जवळपास दोन हजारहुन अधिक मतदार बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रातून काँग्रेस उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना एक मुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला.