खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- उत्तर कर्नाटक/ कारवार लोकसभा मतदारसंघातून “आबकी बार मराठा खासदार” असा आशावाद पल्लवीत झाला आहे. संपूर्ण उत्तर कन्नड जिल्ह्यात डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना वाढता पाठिंबा मिळत असून खानापूर तालुक्याच्या रहिवासी व तालुक्याच्या माजी आमदार असल्याने खानापूर तालुक्यातील देखील त्यांना शंभर टक्के पाठिंबा मिळेल असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खानापूरकर आता पक्षीय राजकारण बाजूला ठेवून उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रात “अबकी बार मराठा खासदार” बनवण्यासाठी चर्चा करत आहेत. खानापूर तालुक्यातून पहिल्यांदाच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यात आता पर्यंत झालेल्या जवळपास 15 लोकसभा निवडणुका पैकी नऊ निवडणुका काँग्रेस पक्षाने जिंकले आहेत. त्यामध्ये एकदा काँग्रेसचे मराठा उमेदवार बी पी कदम यांना या भागातून खासदार म्हणून निवडून आणण्यात आले होते. व्यतिरिक्त या भागातून आतापर्यंत मराठा उमेदवाराला राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे खानापूर, कित्तूर, हल्ल्याळ, जोयडा भागातून गेल्या अनेक वर्षापासूनची असलेली मराठा उमेदवाराची प्रतीक्षा आता फळाला लागेल असा आशावाद निर्माण झाला आहे.
- खानापूर तालुक्यात 70 टक्के मराठा, हल्ल्याळ जोयडा, दांडेली भागामध्ये जरी कन्नड मराठी असे दोन्ही भाषिक असले तरी या भागात मराठा मतदारांची संख्या आहे. त्यामुळे मराठा मतदार यावेळी डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असे वातावरण उत्तर कन्नड कारवार जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये निर्माण झाले आहे. खानापूर तालुक्यात नेहमी प्रत्येक निवडणुकात वेगवेगळ्या प्रकारे राजकारण तापत असते. विधानसभेच्या निवडणुकीत समितीचा बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजप, काँग्रेसने शिरकाव केला. तरीही 1996 पर्यंतच्या काळात समितीच्या पाठीशी राहणारा मतदार लोकसभेला मात्र काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. पण गेल्या 25 वर्षात खासदार आनंदकुमार हेगडे यांच्या वर विश्वास ठेवून या भागातील जनतेने वारंवार त्यांना निवडून दिले. पण त्याची खरी फलस वृत्ती झाली नाही. तालुक्याचा केंद्र शासनाच्या योजना अंतर्गत अपेक्षित विकास झाला नाही. त्यामुळे भाजपच्या खासदार हेगडे यांनी मतदारांचा विश्वासात घात केल्याचा आरोप मर्दा राज्यातून केला जात आहे. त्यांनी केवळ शिरशी कारवार या भागात आपले परस्थ ठेवले. मत याचंना मात्र खानापूर भागात ठेवली. पण विकास आकडे दुर्लक्ष केले. मतदाराने केवळ पंतप्रधान मोदी फॅक्टर पाहून त्यांना मतदान केले व निवडून दिले मात्र त्यांनी इकडे फिरून पाहिले नाही. विधानसभेच्या राजकारणात अनेक इच्छुकांना टांगत्या तलवारीवर ठेवले. अन निर्णय मात्र वेगळेच घेतले. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळीही केला. त्यामुळे अनेक भाजप कार्यकर्ते त्यांच्या कार्यप्रणालीवर संतप्त राहिलेच.
- खानापूर तालुक्यात भाजपची उमेदवारी खानापूर तालुक्यातून मिळावी अशी अशा पल्लवीत होती. पण भाजपच्या वरिष्ठानी खानापूर तालुक्याला प्रतिनिधित्व देण्यात कमीपणा दाखवला. पण काँग्रेसने का असेना खानापूर तालुक्याला प्रतिनिधित्व दिले आहे. त्यामुळे माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या माध्यमातून मराठा व मराठी मतदारांना आता आपल्या हक्काच्या माणसाला मतदान करण्यासाठी पक्ष विरहित राजकारण करण्याची वेळ आली आहे. लोकसभेच्या रिंगणात अनेक उमेदवार उभे राहतील मात्र विजयी होणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी यावेळी मतदार राजा ठामपणे थांबणार आहे. खानापूर तालुक्यातील उच्चांकी मतदान हे उत्तर कन्नड जिल्ह्यातील विजयी खासदाराच्या पारड्यात वजन टाकणारे राहणार आहे. त्यामुळे डॉक्टर अंजली निंबाळकर या खानापूर तालुक्याच्या जवळच्या लोकप्रतिनिधी असल्याने खानापूर तालुक्यातील होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीत यावेळी वाढ होणार यात शंका नाही. त्यामुळे उत्तर कन्नड जिल्ह्यातील इतर भागातून त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा त्यांना विजयापर्यंत पोहोचवणार यात शंका नाही. उत्तर कन्नड जिल्ह्यात आतापर्यंतच्या निवडणुका काँग्रेस पक्षात अनेक वेळा मतभेद गटातटाची राजकारणी झाल्यामुळे त्या भागातून मिळालेल्या उमेदवारीना पुरेसे पाठबळ मिळाले नाही. पण आता खानापूर, कित्तूर भागातून काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्याने भटकळ पासून कारवार ते हल्ल्याळ पर्यंत अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते गटतट बाजूला ठेवून एकाच छताखाली डॉक्टर अंजलीताई निंबाळकर उमेदवार निवडून आणण्यासाठी एकसंघ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचा फायदा डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना नक्कीच मिळणार असून खानापूर तालुक्याने जर त्यांना मताधिक्य देऊन उचलून धरले तर त्या आपल्या भागाच्या व हक्काच्या खासदार राहणार आहेत. यासाठी खानापूर तालुक्यातील जनतेने आता “आबकी बार मराठा खासदार” असा नारा करत डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.