- खानापूर, ता.१४ : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अंगणवाडी भरतीमध्ये मराठी उमेदवारांच्या वर अन्याय झाला असल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आले आहे. या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. असे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव बळवंतराव देसाई, कार्याध्यक्ष श्री मुरलीधर गणपतराव पाटील व श्री निरंजन उदयसिंह सरदेसाई आणि सरचिटणीस श्री आबासाहेब नारायणराव दळवी यांनी आवाहन केले आहे.