- खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी: चापगाव तालुका खानापूर येथे प्रति वर्षाप्रमाणे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रविवार दि. 11 फेब्रुवारी व सोमवार दि. 12 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सद्गुरु नामदेव वास्कर महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने ह भ प गंगाराम नांदुरकर यडोगा यांच्या अधिष्ठान व मार्गदर्शनाखाली सदर पारायण सोहळा होणार आहे. या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.11 रोजी सकाळी 9 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पोथीपूजन होणार आहे. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर,माजी आमदार अरविंद पाटील, शरद केशकामत, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, जोतिबा रेमानी सह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्वागत समारंभ झाल्यानंतर सकाळी 10 वाजता ज्ञानेश्वरी अध्याय वाचन , दुपारी 3 वा गाथा भजन, सायंकाळी ह भ प नागपा अंधारे, यडोगा यांचे प्रवचन, नामजप, रात्री 9 वाजता ह भ प तानाजी पाटील कोरीवडे जि. कोल्हापूर यांचे कीर्तन होणार आहे. रात्री हरीजागर होईल .
- सोमवार दि. 12 रोजी पहाटे काकड आरती, त्यानंतर गावात दिंडी सोहळा होऊन ह भ प विठ्ठल महाराज किरहलसी यांचे काला कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. तरी याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चापगाव वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.