- खानापूर : लक्ष्मी नगर खानापूर येथील रहिवासी असलेला. व बीई इंजिनीयरिंगच्या पहील्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी मंथन अशोक वड्डीन्नावर (19) यांने आपल्या रहात्या घरांत दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि 6 फेब्रुवारी दुपारी घडली आहे.
- याबाबत समजलेली माहिती लक्ष्मी नगर खानापूर येथील रहिवासी व यडोगा ता. खानापूर येथील मराठी शाळेतील कन्नड शिक्षक अशोक वड्डीन्नावर यांचा कनिष्ठ मुलगा बेळगाव येथील बीई इंजिनीयरिंगच्या पहिल्या वर्गात शिकत होता . परीक्षा असल्याचे दुपारी मंथन चा मोठा भाऊ आणि मंथन आपापल्या रूममध्ये अभ्यास करत बसले होते. तुमचा मित्र आल्याने त्यांचा भाऊ मंथनला बोलावण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेला असता, मंथन हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. मंथनची आई हारूरी येथील मराठी शाळेत शिक्षिका आहेत.
- दरम्यान माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या घरी जाऊन पोलिसांना याची कल्पना दिली व मृतदेह शव विच्छेदनासाठी खानापूर येथील सरकारी आरोग्य चिकित्सा केंद्रात दाखल केला. या ठिकाणी खानापूर तालुका पंचायत चे माजी उपसभापती व वन निगमचे माजी राज्य संचालक सुरेश देसाई व माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई माजी आमदार अरविंद पाटील सोबत उपस्थित होते.