- पुणे न्युज : पुणेस्थित ग्रामीण बेळगाव व खानापूर तालुक्यातील क्रिकेट प्रेमी युवकांसाठी पुणे येथे खानापूर प्रीमियर लीग 2024 चौथ्या क्रिकेट स्पर्धा गेल्या 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन पुणे नगरसेवक श्री राजाभाऊ लायगुडे . महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर , श्री संकेत ह. जाधव मा.उपसरपंच नांदेड. श्री किशोर दत्तात्रय पोकळे मनपा भाजपा धायरी, श्री सोपान उर्फ काकासाहेब चव्हाण अध्यक्ष खडकवासला काँग्रेस पार्टी, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री किशन दौलतकर, आधी एक्वा सोल्युशन. श्री परशराम कुट्रे आर्यन एंटरप्राइजेस, श्री विठ्ठल पाखरे उद्योजक पुणे, श्री रतन देसाई उद्योजक पुणे, श्री परशराम पाखरे उद्योजक पुणे, श्री संजू वीर उद्योजक पुणे, श्री गंगाराम घाडी उद्योजक पुणे, श्री नारायण पाटील स्नेहा एंटरप्राईजेस आदींच्या हस्ते झाले. दीप प्रज्वलन श्री पिटर डिसोजा अध्यक्ष खानापूर बेळगाव मित्र मंडळ पुणे, श्री परशुराम सिस्टीम इंजिनिअरिंग पुणे, श्री लक्ष्मण काकतकर उद्योजक पुणे, श्री नारायण गावडे अनिकेत इंडस्ट्रीज पुणे, श्री बाळासाहेब देसाई उद्योजक पुणे, श्री सुरेश हलगी हिंदुस्तान लेझर पुणे, श्री तुकाराम पाटील श्री तेज इंटरप्राईजेस पुणे, श्री शिवाजी जळगेकर सचिव खानापूर मित्र मंडळ पुणे यानी केले.
बक्षीस वितरण
- एक फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बेळगाव खानापूरचे आमदार श्री विठ्ठल हलगेकर, पुणे येथील आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री पीटर डिसोजा, अध्यक्ष खानापूर बेळगाव मित्र मंडळ. श्री मारुती वाणी, वाणी ग्रुप पुणे. श्री संतोष वीर, वाणी ग्रुप पुणे. श्री अतुलशेठ दांगट, दत्त दिगंबर डेव्हलपर्स. श्री विकास देसाई, रेणुका डेव्हलपर्स. श्री राजू गुरव, शारदा इंटरप्राईजेस पुणे. श्री गंगाराम वीर, माऊली इंजिनिअरिंग पुणे. श्री नारायण कोलेकर, भारत ऑटो पार्टस. श्री परशुराम महादेव विर, सिस्टीम इंजिनिअरिंग पुणे. श्री संजीव वाटुपकर कार्याध्यक्ष सुब्रमण्यम साहित्य अकादमी माचीगड अनगडी. श्री सुरेश देशमुख, टेकनोटेड कार्पोरेशन. श्री अनिल कदम सर, मुख्याध्यापक करंबळ हायस्कूल. श्री मारुती गिरी, सचिव सुब्रमण्यम साहित्य अकादमी माचीगड अनगडी. श्रीरामचंद्र बाळेकुंद्री, सी. ए. पुणे श्री विक्रम सुर्वे,लँड डेव्हलपर्स पुणे. श्री शिरीष गुंडप, उद्योजक. याशिवाय प्रमुख उपस्थितीमध्ये श्री दत्ता पडळकर, आयडियल इंजिनिअरिंग पुणे. श्री सोपान उर्फ काका चव्हाण अध्यक्ष खडकवासला म. सं. रा. काँग्रेस पार्टी पुणे. श्री लक्ष्मण काकतकर, उपाध्यक्ष के.एम.एम. पुणे, श्री सुरेश काळे उद्योजक पुणे, श्री विजय पाटील संचालक के. एम. एम. पुणे.श्री निलेश भाऊ कोंढरे- पाटील उपसरपंच आंबेगाव बुद्रुक ,श्री राजू शिंदे उद्योजक पुणे, श्री बाळकृष्ण पाटील संचालक के एम एम पुणे ,श्री शिवाजी जळगेकर सचिव, के एम एम पुणे. श्री हरिभाऊ पाटील उद्योजक पुणे.श्री सुरेश कोलेकर, बी. स्पेस इंटेरियर बेंगलोर. श्री पांडुरंग पाटील संचालक के एम एम पुणे, श्री देमानी मष्णुचे संचालक के एम एम पुणे, श्री विजय हंगिरकर एस व्ही इंटरप्राईजेस पुणे. श्री किरण पाटील प्रोप्रायटर सुरेखा इंटरप्राईजेस पुणे. श्रीरामचंद्र निलजकर संचालक के एम एम पुणे. श्री अनिल भाऊ भुमकर प्रमोटर्स अँड बिल्डर्स पुणे. श्री बाळू कल्लाप्पा फठाण व्हीनस इंजिनिअरिंग पुणे. श्री सहदेव गावडे उद्योजक पुणे, श्री बाळासाहेब देसाई उपाध्यक्ष के एम एम पुणे. श्री सुरेश हलगी हिंदुस्तान लेजर पुणे. श्री नारायण गावडे उद्योजक पुणे. श्री मधुकर पाटील प्रोप्रायटर अतुल इंजिनिअरिंग पुणे. श्री ज्योतिबा माळवी उद्योजक पुणे. श्री परशराम निलजकर संचालक के एम एम पुणे. श्री दत्ता पाटील उद्योजक पुणे आदींच्या हस्ते झाले. शिवाय केपीएल संचालक श्री रामु गुंडप अध्यक्ष, श्री विनायक गुरव उपाध्यक्ष, श्री सचिन पाटील सचिव, श्री विनोद वीर उपसचिव, श्री रामदास घाडी खजिनदार. श्री सतीश पाटील उपखजिनदार, सर्व श्री सदस्य सुनील रेडेकर, श्री सहदेव गावडे, श्री गणपत पाटील, श्री पांडुरंग पाटील, श्री सुराप्पा गुरव, श्रीकृष्णा पाटील श्री कल्लाप्पा लाड, श्री मारुती पाटील, श्री वैभव हंगिरकर, श्री ज्योतिबा माळवी, श्री विनायक गुरव, श्री अनिल वीर, श्री विश्वनाथ पाटील, श्री प्रेमानंद गुरव, श्री लिंगाप्पा पाटील, श्री पुंडलिक पाटील, श्री संजय नांदोडकर, श्री शंकर पठाण या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
- या स्पर्धेकरिता प्रबोधन क्रमांकाचे बक्षीस रुपये 30,001 यांनी ठेवले होते. तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 25001 (उद्योजक मारुती वाणी) तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 20001 (उद्योजक गंगाराम वीर) तर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस 15001(उद्योजक सुरेश देशमुख) यांनी ठेवले होते. यामध्ये चौथा क्रमांक चाळोबा एलेवन या संघाला मिळाला तिसऱ्या क्रमांकावर ॐसाई चॅलेंजर हा संघ विजेता ठरला असून उपविजेते पद व्ही एन. पी सोल्यूशन या संघाने मिळविले तर यावर्षीचा कप शिवस्वराज प्रतिष्ठापन या संघाने जिंकला आहे. यावर्षी एकूण 24 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामुळे मैत्रीपूर्ण वातावरण मैदानावरती पसरले होते. या सर्व विजेत्या संघांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.