- बेळगाव- : बेळगाव तालुक्यातील न्यू वटमुरी गावातील ही घटना. 11 डिसेंबर 2023 रोजी एक तरुणी आपल्या साखरपुडधाच्या दिवशी त्याच गावात राहणाऱ्या तिच्या प्रियकरासमवेत पळून गेली. याचा राग तरुणीच्या कुटुंबीयांना आल्यानंतर त्यांनी थेट त्या तरुणाच्या घरी धाव घेतली. त्याच्या आईला बेदम मारहाण केली. तसेच, या महिलेची नग्नावस्थेच धिंड काढून तिला एका विजेच्या खांबाला तब्बल दोन तास बांधून ठेवलं. या प्रकरणामुळे बेळगावमध्ये खळबळ उडाली होती. राज्यभर चर्चाही झाली. पण अखेर ते प्रेमी युगुल (कपल) कायदेशीर रित्या विवाह बंधनात अडकले असून त्यांनी आपल्या आयुष्याची लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
- त्यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण अचानक त्यांनी लग्न केल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला असून भविष्यातही याचे परिणाम दिसू शकतात. वटमुरी गावातील प्रेमी युगुलांचे लग्न झाले आहे. बेळगाव शहरातील दक्षिण उपनिबंधक कार्यालयात हा विवाह पोलिसांच्या उपस्थितीत पार पडला. बेळगाव जिल्हा पोलिसांनी प्रेमीयुगुलांना संरक्षण दिले होते. आता कायदेशीररित्या सब-रजिस्ट्रार ऑफिसमध्ये लग्न केले
- वंटमुरी गावातील दुडाप्पा अशोक नायक हा तरुण आणि प्रियंका बसप्पा नायक ही तरुणी एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र तरुणीच्या आई-वडिलांनी तिचे प्रेम नाकारले आणि तरुणीचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी करण्याचा निर्णय घेतला. तरुणीच्या साखरपुड्याच्या आदल्या दिवशी हा प्रकार समजल्यानंतर दोघेही तेथून पळून गेले. मुलगी तरुणासोबत पळून गेल्याचे समजताच तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या घरात घुसून बाहेर झोपलेल्या टुंडाप्पाची आईला ओढत नेले आणि तिच्यावर हल्ला केला.
- दरम्यान, त्या रात्री 11 वाजता आधी मारहाण, नंतर नग्न धिंड काढल्यानतर या महिलेला दोन तास वीजेच्या खांबाला बांधून ठेवण्यात आलं. यावरून न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. “त्या महिलेला त्या दानवाच्या दयेवर सोडून देण्यात आलं होत. कल्पना करा त्या महिलेला या सगळ्याचा किती मोठा धक्का बसला असेल, आपण जोपर्यंत त्या महिलेच्या जागी स्वतःला ठेवत नाही, तोपर्यंत आपल्याला हे जाणवणार नाही, आरोपींना माणूस म्हणायची मला लाज वाटतेय. कुणी इतक क्रूर कसं होऊ शकतं?” असा उद्विग्न सवाल न्यायालयाने यावेळी केला.