- बेळगाव: मराठी आणि कन्नड भाषिकात लोकसभा निवडणुकीच्या वेळी तेढ निर्माण केल्याच्या आरोपातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधु कणबर्गी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार नसल्याने मराठी मतदारांनी नोटाच्या पर्यायाला मतदान करावे असे आवाहन करून ज्येष्ठ समिती कार्यकर्ते मधु कणबर्गी जनतेत जनजागृती केली होती. दि.१४ एप्रिल २०१४ रोजी किर्लोस्कर रोडवर मधु कणबर्गी हे मराठी भाषिकाना जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटून नोटा पर्यायाला मतदान करण्याचे आवाहन केले होते.यावेळी निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी खडेबाजार पोलिसांच्या समवेत तेथे जावून त्यांच्यावर मराठी कन्नड भाषिकात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप ठेऊन मधु कणबर्गी यांच्यावर खडे बाजार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. या संबंधी पोलिसांनी तृतीय जे एम एफ सी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून साक्षी ,पुरावे नोंदवले होते.पत्रके देखील न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात आली होती.पण सरकार पक्षाला गुन्हा शाबीत करता आला नाही म्हणून तृतीय जे एम एफ सी न्यायालयाने मधु कणबर्गी यांची निर्दोष मुक्तता केली .मधु कणबर्गी यांच्यातर्फे वकील महेश बिर्जे, एम.बी.बोंद्रे, शंकर पाटील ,बाळासाहेब कागणकर आणि वैभव कुट्रे यांनी न्यायालयात बाजू मांडली.