बेळगांव: अयोध्या येथे 22 जानेवारीला होणाऱ्या श्रीरामलाच्या मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन समारंभाचे विविध संपूर्ण जगभरात लागले आहेत. श्रीराम प्रभू हे हिंदूंचे आराध्य दैवत असून प्रत्येक घराघरात मंदिरात प्रत्येकाच्या मनात श्री राम भक्ती भाव उसांडून निघत आहे. अशाच प्रकारे नेहमी वेगवेगळ्या कला कलिंगडच्या माध्यमातून साकारून एक वेगळे रूप दाखवणारे एक बेळगाव येथील RK Chef कल्लाप्पा शिवाजी भातकांडे यांनी कलिंगड फळामध्ये श्री राम प्रभूची मूर्ती , तसेच भक्त हनुमान मुर्ती साकारून एक अनोखी सेवा दाखवली आहे या त्यांच्या कलाकृती बद्दल नेहमीच सर्वत्र अभिनंदन होते आजही श्रीराम प्रभूच्या या मूर्ती रेखाटणाबद्दल विशेष अभिनंदन होत आहे .