- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: भारतीय संस्कृतीत सुगरण या नावाला अधिक महत्त्व आहे प्रत्येक घराघरात विविध स्वरूपाची पक्वान्ने तयार करण्याची पद्धत आहे. अशाच पद्धतीने विद्यार्थी जीवनातच वेगळा अन्नपदार्थांचा अनुभव तसेच करण्याची पद्धत मराठा मुलींच्या आचरित व्हावी यासाठी अशा उपक्रमांची गरज असून विद्यार्थ्यांनी अशामध्ये सहभाग दर्शवावा असे विचार मराठा मंडळाचे संचालक शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले. खानापूर येथील मराठा मंडळ बेळगाव संचलित मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूल येथे नुकताच अन्नोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
- याप्रसंगी मराठा मंडळ चे संचालक शिवाजीराव पाटील यांच्या शुभहस्ते अन्नोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी, बीआरसी समन्वय अधिकारी ए आर अंबगी, शंकर कम्मार सर सीआर पी चे जनकटी, माजी मुख्याध्यापक एस आर हत्ती व इतर शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या अन्नोत्सवामध्ये बऱ्याच हौशी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडले होते. यामध्ये पाणीपुरी, भेळपुरी, शीतपेये, भडंग, आंबट गोड जिगळी, चिंचा, आवळे, बालुशी,शिरा, केक, सँडविच, पापडी अशा विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. या अन्नोत्सवाचा हायस्कूल मधील विद्यार्थ्यांबरोबरच मराठा मंडळ तारारणी हायस्कूल मराठा मंडळ कॉलेज व मराठा मंडळ सिद्धिविनायक इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. हा अन्नोत्सव यशस्वी करण्यासाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी एस डी पाटील श्रीमतीआर टी टक्केकर व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.