- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा कै नागाप्पा होसूरकर, कुप्पटगिरी यांना खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा कै. पैलवान मारूती बेन्नाळकर, कै. मधू बांदेकर, कै. महादेव बारागडी, कै. लक्ष्मण गावडे, आणि निपाणीतील कै. श्रीमती कमलाबाई मोहिते, तसेच ९ मार्च १९५६ रोजी सुरू झालेल्या सीमा सत्याग्रहात भाग घेतलेल्या कै. नागाप्पा होसूरकर या सत्याग्रहीनी हिंडलगा कारागृहात प्राणार्पण केले. तसेच १ नोव्हेंबर १९५८ पासून सुरू झालेल्या दुसऱ्या सीमा सत्याग्रहात कै. गोपाळ चौगुले यांनी बळ्ळारी कारागृहात प्राणार्पण केले. मुंबई येथे शिवसेनेने सीमाप्रश्नासाठी उभारलेल्या प्रचंड आंदोलनात ६७ शिवसैनिकांनी प्राणार्पण केले, कन्नड सक्तीच्या निषेधार्थ संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीने १ जून १९८६ रोजी केलेल्या आंदोलनात हिंडलगा येथील कै. मोहन पाटील, कै. परशराम लाळगे, कै. भरमाणा कदम यांचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बळी पडला. बेळगुंदी येथील झालेल्या गोळीबारात कै. भावकु चव्हाण, कै. कल्लाप्पा उचगांवकर, कै. मारुती गावडा यांचा बळी घेतला. जुणे बेळगांव येथे कै. शंकर खन्नूकर, हिंदवाडी येथे कै. कुमारी विद्या शिंदोळकर याशिवाय बॅरिस्टर नाथ पै यांनी प्राणार्पण केले. तसेच सीमाभागाचे अग्रणी नेते शेकापचे प्रमुख कै. प्राध्यापक एन. डी. पाटील या सर्व हुतात्म्यांना खानापूर येथील हुतात्मा स्मारकाजवळ विनम्र अभिवादन करण्यात आले.
- यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजनसिंह सरदेसाई, माजी सभापती मारूतीराव परमेकर, माजी जि पं सदस्य जयराम देसाई, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी ता. पं. सदस्य नारायण कापोलकर, म ए समितीनेते प्रकाश चव्हाण, खजिनदार संजीव पाटील, सहचिटणीस रणजीत पाटील, नंदगड विभागाचे उपाध्यक्ष रमेश धबाले, गर्लगुंजी विभागाचे उपाध्यक्ष कृष्णा कुंभार, मध्यवर्ती म ए समिती सदस्य जगन्नाथ बिर्जे, खानापूर शहर उपाध्यक्ष मारूती गुरव, खानापूर अर्बन बॅंकेचे चेअरमन अमृत शेलार, माजी ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत, माजी जि. पं. सदस्य श्री पुंडलिक कारलगेकर, माजी जि. पं. सदस्य विलास बेळगांवकर, मध्यवर्ती म ए समिती सदस्य शामराव पाटील चन्नेवाडी, सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण, ॲड. अरूण सरदेसाई, मध्यवर्ती म ए समिती सदस्य श्री अजित पाटील, मध्यवर्ती म ए समिती सदस्य गोपाळराव पाटील, मध्यवर्ती म ए समिती सदस्य रुक्माणा झुंजवाडकर, ॲड. केशव कळ्ळेकर, मर्याप्पा पाटील, गणपती पाटील, विजयसिंह रजपूत, देवाप्पा पाटील, ईश्वर बोबाटे, यशवंत बिर्जे, गोपाळ हेब्बाळकर, श्म्हात्रू धबाले, तुळजाराम गुरव, मोहन गुरव, राघोबा मादार, बी. बी. पाटील सर, बी. एन. पाटील, पुंडलिक पाटील, शिवाजी देसाई, दुदाप्पा कुंभार, नितीन देसाई, पुंडलिक मोटार, संतोष पाटील, विनायक पाटील, सीताराम बेडरे, शिवाजी पाटील, शिवाजी सहदेव पाटील, रविकांत हळदणकर, प्रभाकर साळगावकर, प्रल्हाद मादार, मधू पाटील, वसंत नावलकर, मध्यवर्ती म ए समिती सदस्य रविंद्र शिंदे, शंकर पाटील, शरद पाटील, मुकुंद पाटील, डी एम भोसले गुरूजी, महंमद बेलगामी, लक्ष्मण पाटील, पत्रकार विवेक गिरी, एम ए खांबले, श्रीकांत पाटील, नारायण देसाई (क्लासिक टेलर), प्रवीण पाटील, वैभव बिर्जे, पत्रकार वासुदेव चौगुले, शिवानंद सुळकर, उमाकांत वाघधरे, वसंत गोरल, अनंत पाटील यांसह अनेक कार्यकर्ते हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सरचिटणीस श्री आबासाहेब दळवी यांनी केले, कै. नागाप्पा होसूरकर यांच्या प्रतिमेला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मालार्पण करून सर्व उपस्थितांच्या समवेत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सीमाचळवळ आणि सीमाप्रश्न व हुतात्मे या संदर्भात माजी सभापती मारूतीराव परमेकर, माजी आमदार दिगंबरराव पाटील, सीमासत्याग्रही पुंडलिकराव चव्हाण, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, जगन्नाथ बिर्जे, अध्यक्ष श्गोपाळराव देसाई यांची हुतात्म्यांना अभिवादनपर भाषणे झाली.