बेळगाव: क्षीरभाग्यच्या दुधात पाल पडल्याने उळ्ळागड्डी खानापूर गावातील शासकीय प्राथमिक शाळेतील 26 विद्यार्थी आजारी पडल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील उळ्ळागडी खानापूर शासकीय प्राथमिक शाळेतील 26 विद्यार्थ्यांनी दुधाचे सेवन केल्याने त्यांना स्थानिक संकेश्वर सामुदायिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गावात एकाच कॅम्पसमध्ये सरकारी प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि उर्दू शाळा आहे. एकूण 540 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आजही नेहमीप्रमाणे स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शाळेला दूध पुरवठा करण्यात आला. विद्यार्थी दूध पिण्यासाठी रांगेत उभे असताना पाल पडली असावी. दरम्यान, 40 विद्यार्थ्यांनी दूध प्राशन केले होते. पाल दिसल्याने विद्यार्थ्यांना दूध वाटप बंद करण्यात आले. दरम्यान, काही विद्यार्थ्यांना उलट्या होत असल्याचे दिसू लागल्याने त्यांना दोन रुग्णवाहिकेतून जवळच्या संकेश्वर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
एकूण 26 विद्याध्यर्थ्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे. सध्या उपचारानंतर मुलांची प्रकृती सुधारली आहे. क्षेत्र शिक्षणाधिकारी प्रभावती यांनी रुग्णालयात जाऊन मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकरणाबाबत हुक्केरी घटक शिक्षणाधिकारी प्रभावती यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती घेतली. यावर ते म्हणाले की, आज 40 विद्यार्थ्यांनी क्षीराभाग्यचे दूध सेवन केले होते. यामध्ये 26 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती बरी झाल्याची माहिती त्यांनी दिली.