IMG_20240108_223005
  • खानापूर लाईव्ह न्युज/प्रतिनिधी :
  • ग्रामपंचायत म्हणजे गावच्या वैभवाचे ठिकाण. शासकीय , सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक काम ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून साकारली जाते. म्हणून खेड्यांच्या विकासासाठी ग्राम पंचायत हा मानबिंदू मानला जातो. ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावाच्या विकासासाठी उत्तम प्रशासकीय व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी काम करणारे पंचायत सदस्य ही नीटनेटके असणे आवश्यक आहे. अशाच पंक्तीत येणारी खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायत असून गेल्या काही वर्षात या ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी विशेष कामे राबवून पंचायत क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी विशेष श्रम घेतले आहेत. त्यामुळे आदर्शवत ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते त्याचाच एक भाग म्हणून आज ग्रामपंचायतीने नरेगा योजनेअंतर्गत तसेच एन एल आर एम योजनेअंतर्गत एकूण 37 लाखाची उत्तम इमारत बांधणीचा संकल्प हाती घेतला असल्याने हलगा ग्रामपंचायत विशेष अभिनंदन पात्र ठरली असल्याचे विचार खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. आज सोमवारी या ठिकाणी नव्याने बांधण्यात येत असलेल्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
  • यावेळी हलगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष महाबळेश्वर परशुराम पाटील उपाध्यक्ष मंदा पठाण ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पाटील प्रवीण गावडा सुनील पाटील स्वाती पाटील नाजिया संधी इंद्राताई मेदार कुडाळ येथील उद्योगपती राजू गुरव उद्योगपती रवी रूपन पंचायत डॉलपमेंट ऑफिसर परशुराम समीर सनदी पंचायत सर्व स्टॉप उपस्थित होते.
  • यावेळी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील म्हणाले, हलगा ग्रामपंचायत क्षेत्रात गेल्या आठ ,दहा वर्षांमध्ये जनतेने दिलेले सहकार्य तसेच शासकीय पातळीवर भागाच्या विकासासाठी आजी-माजी आमदारांनी दिलेली विकासाभिमुख चालना यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी या भागातील प्रत्येक नागरिक साक्षी ठरला आहे. आज नरेगा अंतर्गत अनेक कामे राबवून पूरक निधी राबवण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत त्यामुळेच आता गावच्या केंद्रस्थानी असणारी ग्रामपंचायत इमारतीसाठी 20 लाखाची नरेगातून निधी मंजूर झाला आहे. तर nlrm मधून 17 लाख 50 हजार एकूण 37 लाख 50 हजार ची निधी मंजूर झालेली आहे. अशी माहिती त्यानी दिली.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us