IMG-20240107-WA0006

खानापूर: तालुक्यात अलीकडे आगीच्या वनव्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे उभ्या ऊस पिकासह बागायत पिकांवर याचा मोठा फटका बसत असून दररोज एखाद्या ठिकाणी तरी आगीच्या फडक्यामध्ये ऊस पिक, काजू पीक सहभाग मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये तालुक्यांत आगीच्या वनव्याची सलगता सुरू असताना शनिवारी दुपारी पुन्हा खानापूर तालुक्यातील कुपटगिरी येथील pdo हनुमंत विष्णू पाटील यांच्या शेतवडीतील पिकात अचानकपणे आग लागल्याने त्यांचे जवळपास एक एकरातील ऊस पिक जळून खाक झाले. शिवाय काजू, चिकूच्या बागाही जळून नुकसान झाले आहे. आग लागल्याचे करताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी येऊन तो विजवण्यात आली ,नसेल तर परिसरातील आणखीन काही काजू बागा व ऊस पिकाचे नुकसान झाले असते. सध्या हिवाळा असला तरी उन्हाचे वातावरण आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी आग पेटवणे किंवा कोणत्या ठिकाणी नकळत आग पेटवलेली न विजवता जाणे हे धोक्याचे बनले आह. शेतवडित पिके मोठ्या प्रमाणात आहेत. त्यासाठी आजूबाजूच्या शेतकऱ्याने देखील सतर्कता राखत आपल्या ही व इतरांच्या ही शेती पिकाचे रक्षण करावे. अशी आव्हानात्मक विनंती करण्यात येत आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us