खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : लग्न सोहळा म्हणजे वधू वराडी दोन्हीकडच्या मंडळींच्या आनंदाचा क्षण, विवाह जमल्यानंतर वधू- वर सह दोन्ही कुटुंबातील नाते हे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे निर्माण करून भविष्यातील चांगल्या नात्याची आस धरतात. पण लग्न जमल्यानंतर वधूंच्या मंडळींकडून नोटंकी करत पैसे उधळून त्यांना जेरीस आणण्याचा न कळतपणे प्रकार करणे, हळदीला उपस्थित राहून वधूला जाणीवपूर्वक नमविण्याचा प्रयत्न करून अपमान करणाऱ्या वराला वधूच्या मंडळींनी चांगलाच चोप दिला. अन त्या वराची वागणूक लक्षात घेता फसवणुकीच्या गुन्ह्याखाली त्याच्यावर खानापूर पोलिसात तक्रार करून ऐनवेळी विवाह सोहळा रद्द करण्यात आल्याचा प्रकार खानापुरात रविवारी घडला आहे.
याबाबत हकीकत की, खानापूर शहरातील एका मंगल कार्यालयात रविवारी एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. खानापूर तालुक्यातील एका खेडेगावातील मुलीचा विवाह मुळगाव कडोली ता. बेळगाव (सध्या रा.हुबळी – धारवाड) येथील सचिन विठोबा पाटील नामक युवकाबरोबर ठरवण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी हळदी कार्यक्रम व रविवारी विवाह सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते. सर्व पाहुणे मंडळींना निमंत्रित करून विवाह सोहळ्याची मेजवानी ही दोन्ही घरच्या मंडळींनी केली. पण इकडे त्या वर मुलाने महिन्याभरात नववधूच्या घरच्या मंडळींकडून वेगवेगळी कारणे सांगत पैशांची मागणी करणे, त्यांना फोनवरून अवेरावी शब्दात भाष्य करणे असे प्रकार करत होता. पण त्या नववधू व घरच्यांनी त्याच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते.पण त्याने ऐनवेळी लग्नसमारंभात आपली खरी प्रवृत्ती दाखवण्याचा प्रकार केला. नियोजनानुसार दोन्ही कडचे वऱ्हाडी मंडळी मंगल कार्यालयात हजर झाली खरी. हळदी कार्यक्रमही सुरू झाला. पण त्या नवर्याच्या वागण्यात सुधारणा दिशेनाशी झाली. हळदी कार्यक्रमात नववधूचा अपमान करणे, हुंड्याची, पैशाची मागणी करणे, उद्धट बोलणे असे प्रकार करत असल्याचे वधूच्या घरच्या मंडळींच्या लक्षात आले. त्याला व त्यांच्या घरच्या मंडळींना धारेवर धरताच तिथून त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित वधूच्या मंडळींनी त्याला ताब्यात घेऊन त्याला चांगला चोप दिला. आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. इकडे हळदी समारंभाचा कार्यक्रमाचे नियोजन पाहुण्यांची, अनेकांची उपस्थिती त्यातच त्या वराने घातलेला गोंधळ यामुळे वधूच्या घरच्या मंडळींना काहीच सूचनाचे झाले. पण वेळीच त्या वराच्या वागणुकीचा प्रकार लक्षात आल्याने एक वेळ लग्न नसले तरी चालेल पण अशा मुलाबरोबर आपली मुलगी देऊन चालणार नाही असा पवित्रा घेत ऐनवेळी विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रविवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान खानापूर शहरात आयोजित हा विवाह सोहळा ऐनवेळी रद्द करण्याचा प्रकार खानापुरात पहिल्यांदाच घडला. तर इकडे संताप वधूच्या घरच्या मंडळींनी त्या वराला पोलिसांच्या स्वाधीन करून त्याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली एफ आय आर दाखल करून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.