IMG-20231230-WA0009
  • खानापूर: मराठा मंडळ संचलित खानापूर मराठा मंडळ हायर सेकंडरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दि.27 रोजी दोड्डबाळापुर बेंगलोर ग्रामीण येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरावरील विज्ञान वस्तू प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले आहे . त्यामूळे या विज्ञान प्रकल्पाला अखिल भारतीय दक्षिण विभागातील स्पर्धेमध्ये साठी निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये असंप्रदायक पद्धतीने विद्युत उत्पत्ती निर्माण करणारा प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केला होता .तेथील परीक्षकांनी या प्रकल्पाचे तोंड भरून कौतुक करून त्या प्रकल्पाला दक्षिण भारत विभागात प्रवेश मिळून दिला आहे .या प्रकल्पाची तयारी करण्यासाठी हायस्कूलचे विज्ञान विषयक शिक्षक एस एम मुतगी यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार आकाश पाटील व कुमार बसवाणी कुकडोळी या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन हा प्रकल्प सादर केला होता. या कार्यासाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक के.व्ही. कुलकर्णी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले .आज हायस्कूल मध्ये झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे जेष्ठ संचालक शिवाजीराव पाटील व खानापूर तालुका क्षेत्र गटशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची मॅडम मुख्याध्यापक के. व्ही कुलकर्णी, सहशिक्षक एस डी गुरव, टी आर पत्री इतर शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या .यावेळी उपस्थित पाहुणे शिक्षक व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी यांनी दक्षिण भारत विभागामध्ये विजयवाडा आंध्र प्रदेश येथे दि. 27 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रकल्प प्रदर्शनास भरभरून शुभेच्छा दिल्या.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us