खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा 13वा अमृत महोत्सव सोहळा शनिवार दि. 30 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. खानापूर येथील राजा शिवछत्रपती स्मारकात आयोजित या अमृत महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, तालुका म ए समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, माजी अध्यक्ष म. ए. समिती विलास बेळगावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई सह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष डी. एम. भोसले राहणार आहे. या कार्यक्रमात खानापूर को.बँकेचे चेअरमन अमृत शेलार, तालुका समितीचे सचिव आबासाहेब दळवी, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, विवेक गिरी आदींच्या हस्ते विविध दैवतांचे प्रतिमेचे पूजन होणार आहे. या अमृत महोत्सव सोडण्यात वयाची 75 वर्षे गाठलेल्या निवृत्त शिक्षक बाळू पाटील, झुंजवाड. गंगाधर देसाई, निडगल ,वासंती पाटील, कुपटगिरी, गोविंद धबाले, झुंजवाड वामनराव पाटील कारलगा, गंगाराम चोपडे, जळगे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सत्काराचे आयोजन निवृत्त मॉडेल मुख्याध्यापक बाबुराव नारायण पाटील (गर्लगुंजी) यांच्या वतीने करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात आले असून खानापूर तालुक्यातील सर्व सेवानिवृत्ती शिक्षक आजी-माजी शिक्षकांनी सोहळ्याला उपस्थित राहून उपकृत करावे असे आवाहन तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्ती शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.