- खानापूर लाईव्ह न्युज: प्रतिनिधी :: कर्नाटक तसेच गोवा राज्यांना जोडणाऱ्या बेळगाव साखळी व्हाया चोर्ला तसेच बेळगाव पणजी व्हाया अनमोड या राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद जी सावंत यांच्या उपस्थितीत खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या समवेत विकासात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीत गोवा तसेच कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या या दोन मुख्य रस्त्या संदर्भात बराच काळ चर्चा करण्यात आली. सदर दोन्ही महामार्ग हे कर्नाटकातून गोव्याला जोडणारे मुख्य रस्ते असल्याने गोव्याच्या पर्यटनाला या रस्त्यांचे प्रमुख स्थान आहे. यासाठी हे दोन्ही रस्ते तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय अवजड व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडले. दरम्यान आमदार विठ्ठल हलगेकर तसेच खानापूर भाजपाचे नेते प्रमोद कोचेरी, अभिजीत चांदिलकर या बैठकीला उपस्थित होते.
- यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेळगाव व्हाया चोर्ला या राज्य मार्गाचे अलीकडे महामार्ग प्राधिकरण मध्ये समावेश करण्यात आला असून 148 कोटीचा निधीही मंजूर झाला आहे. पर्यावरण तथा वन खात्याच्या अडचणी दूर करून मंजूर रस्ता भक्कम करावा. शिवाय बेळगाव पणजी व्हाया रामनगर अनमोड या रस्त्याचे ही काम अर्धवट राहिले आहे. या दोन्ही मुख्य रस्त्यांची प्रलंबित कामे हाती घेऊन रस्त्याची समस्या दूर करावी अशी मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केली. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी या दोन्ही मुख्य रस्त्या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन यावेळी दिले. शिवाय आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्यातून जाणाऱ्या आणखी मुख्य रस्त्या संदर्भातही निधीसाठी मांडणी केली. यापूर्वी दिल्ली दरबारी भेट घेऊन केलेल्या मागणीनुसार खानापूर शहरांतर्गत महामार्गाचे दुपदरीकरण करून हा तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा अशी विनंती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केली.
गोवा- बेळगाव होणारं नवीन समांतर रस्ता ! गोव्यातील कार्यक्रमात गडकरी यांची घोषणा!
- दरम्यान साखळी ते खानापूर बेळगाव मार्गे चोर्ला हा समांतर रस्ता पर्यावरण प्रोटोकॉल नुसार बांधला जाणार आहे. या प्रस्तावित महामार्गाचे काम जलद गतीने सुरू करण्यात येणार आहे. गोवा चोरला या समांतर रस्त्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरच गोमंतकियाच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोवा येथे विविध प्रकल्पना मंजुरी पर आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
आज गोव्यात पालकमंत्री सतीश जारकीहोळी समवेत बैठक !
- कर्नाटक तसेच गोवा राज्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या विकास कामा संदर्भात केंद्रीय अवजड मंत्री नितीनजी गडकरी यांनी बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या समवेत रविवार दि 24 रोजी गोवा येथील सिदाते हॉटेल मध्ये दु.12 वा. बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला बेळगावचे पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत दोन्ही मुख्य रस्त्या संदर्भात पर्यावरणाची अडचण तसेच वन खात्याच्या अडचणी दूर करून यावर चर्चा करण्यात येणार आहे. प्रामुख्याने बेळगाव व्हाया अनमोड पणजी हा रस्ता संतगतीने सुरू आहे. कंत्राटदाराने वेळीच काम केले नाही तर दुसऱ्या कंत्राटदराला काम देऊन लवकरात लवकर काम करण्यासाठी ही सूचना केली आहे. तर जांबोटी व्हाया चोरला हा रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी मंजूर झालेल्या १४८ कोटीच्या निधीतून महामार्ग दुरुस्तीत असलेल्या अडचणी दूर करून समस्या सोडवण्यासाठी उद्या पालकमंत्र्यासमोरची बैठक ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
गोवा: केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के सिंग समवेत गोव्याचे मुखयमंत्री प्रमोद सावंत,आमदार विठ्ठल हलगेकर, प्रमोद कोचेरि, अभिजीत चांदीलकर व इतर