खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- आमच्याच मेडियावर आपण काही महिन्यांपूर्वी “ती” बनली सर्जन” या मथळ्याखाली 2 ऑगस्ट 2023 रोजी बातमी वाचली होती. आणि मराठा समाजाचा अभिमान द्विगुणित झाला होत. त्याच बातमीत डॉ स्नेहल मन्नुरकर या NEET-SS (नीट एस एस) या खडतर माणल्या जाणाऱ्या परिक्षेची कसून तयारी करीत असल्याचा उल्लेखही वाचला होता.
- होय , आज पुन्हा एकदा वर्ष २०२३ च्या पूर्वसंध्येला एकवीसाव्या शतकाच्या क्षितिजावर आपल्या कौशल्याचा, बौद्धिक धवल क्रांतीचा आणि जाज्वल्य ध्येय निश्चितीचा झेंडा 🚩 डॉ स्नेहल मन्नुरकर यांनी फडकवला आहे.२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या नीट एस एस या अत्यंत कठीण परीक्षेत देशात 407 वा क्रमांक मिळविण्याची किमया केली आहे. आता त्या सेठ जी एस मेडीकल काॅलेज व के ई एम हाॅस्पिटल मुंबई येथून न्युरो सर्जरी विषयात (MCH)वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च माणल्या शिक्षणाला गवसणी घालणार आहेत. डॉ स्नेहल मन्नुरकर या बेळगाव येथील शिवाजी नगर येथील मराठा मंडळ शिक्षण संस्थेतील कार्यालयीन लेखा व्यवस्थापक मंडळातील श्रीयुत लक्ष्मणराव मन्नुरकर यांची कन्या असून मराठा मंडळ इंग्रजी माध्यम बेळगाव येथील माजी विद्यार्थ्यांनी असून यांचे पदवीपूर्व शिक्षण येथील आर एल एस काॅलेजमध्ये झाले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हरमेंट मेडीकल काॅलेज कोल्हापूर येथून एम बी बी एस उज्ज्वल गुणवतेसह पूर्ण करीत श्री भाऊसाहेब हिरे गव्हरमेंट मेडिकल कॉलेज धुळे येथून एम एस चे शिक्षण पूर्ण केले आहे.
- समस्त मराठी महिला व मराठा समाजासाठी भूषणावह असणाऱ्या डॉ स्नेहल यांनी सर्वसामान्यांच्या कुटुंबात जन्माला येऊन आपल्या निस्सीम प्रतिभेचा लख्ख प्रकाश दशदिशात पसरवला आहे. समाजभूषण डाॅक्टर स्नेहल यांच्या क्रांतिकारक यशाचे मनःपूर्वक कौतुक होत आहे.