IMG_20231214_201225

प्रतिनिधी! खानापूर

  • श्री सुब्रम्हण्यम् साहित्य अकादमी माचीगड-अनगडी तालुका खानापूर यांच्यावतीने दि. 24 डिसेंबर रोजी 27 वे मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. संयोजकांकडून संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून, माचीगड येथे होणारे हे मराठी साहित्य संमेलन खानापूर तालुक्यातील एकमेव संमेलन म्हणून ख्याती आहे. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी प्रतिवर्षी दर्जेदार साहित्यिकांना आमंत्रित करून त्यांच्या व्याख्यानाचा लाभ सर्वदूर पोहोचविण्यासाठी साहित्य अकादमी नेहमीच प्रयत्नशील असते.
  • 1947 साली अनगडी येथे पहिल्या संमेलनाचा श्रीगणेशा झाल्यानंतर आजतागायत माचीगड मुक्कामी 25 संमेलने अतिशय थाटात झाली आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नामवंत साहित्यिकांना बोलविण्याचा प्रयत्न अकादमीने चालविला आहे.
  • रविवार दि. 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता होणार असून हे संमेलन चार सत्रात होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनील कुमार लवटे ते राहणार असून उद्घाटन कार्यक्रमात दीप प्रज्वलन आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर आमदार दिगंबर पाटील माजी आमदार अरविंद पाटील जांबोटी सोसायटी जन्मला बेळगावकर, भाजप जिल्हा महिला मोर्चा सेक्रेटरी धनश्री सरदेसाई, शिवसेना राज्यउपाध्यक्षके पी पाटील, लैलाचे एम डी सदानंद पाटील, विकास देसाई सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
  • उद्घाटन कार्यक्रमानंतर सत्कार आणि प्रकाशन सोहळा अध्यक्षांचे अभिभाषण होईल. दुसऱ्या सत्रात दुपारी 1 वाजता “कल्याणकारी राजा श्री शिवछत्रपती” या विषयावर ज्येष्ठ विचारवंत ॲड उदय महादेव मोरे यांचे व्याख्यान होणार आहे.
  • सत्र तिसरे कविसंमेलन” कवितेच्या जाऊ गावा”हे दुपारी 2.30 वाजता होणार आहे. तरच होते मनोरंजनाचे सत्र दुपारी 3 वाजता होणार असून यामध्ये राधानगरीची हास्य कलाकार संभाजी भगवान यादव (कौलवकर) यांचा स्मरणात राहणारा स्टार्मी कॉमेडी पॅलेस हास्य प्रधान कॉमेडी कार्यक्रम होणार आहे.
  • सायंकाळी 7: ते 9:30 या कालावधीत “संत निरंकारी अध्यात्मिक सत्संग सोहळा प. पू . वेदाचार्य महात्मा दतात्रय जागताप जी (ज्ञान प्राचारक) विटा , सांगली यांच्या पावन उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
  • या संमेलनाच्या तयारीसाठी श्री सुब्रमण्यम अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील, कार्याध्यक्ष संजीव वाटुपकर, स्वागताध्यक्ष पीटर डिसोझा, कोषाध्यक्ष नारायण मोरे, सचिव एम. पी. गिरी, प्रा. अजित सगरे, संचालक रामू गुंडप, यल्लाप्पा शिंदे, रामा पवार, तुकाराम कुट्रे, आर. जी. शिंदे, महादेव मोरे, परशराम कोलकार, बसवराज खटावकर, संभाजी बावडेकर, संभाजी शिवठणकर, तम्माणा कोलकार, वाय. एन. कोलकार, तम्मांण्णा पाटील, अरुण कुटे, विनायक भुतेवाडकर आदी कार्यकर्ते संमेलनाच्या तयारीला लागले आहेत.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us