Screenshot_20231201_160348

बेळगाव- कर्नाटक राज्य सरकारने (Karnataka Government) पहिल्या हप्त्यात र 2000 रुपयांपर्यंत पीक नुकसानीची भरपाई मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने अद्याप प्राथमिक बैठक घेतली नसल्याने राज्याकडून तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने केंद्राला लिहिलेल्या पत्रांना अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यातील 3 मंत्री दिल्लीला गेले आहेत. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. राज्य सरकारने पहिला हप्ता जारी केला आहे. कारण केंद्राकडून पैसे येईपर्यंत ते थांबू शकत नाही. आता पहिल्या हप्त्यात प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2000 रुपये पीक नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील 223 तालुके तीन टप्प्यांत दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले असून, 48.19 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. 18171.44 कोटी नुकसान भरपाईसाठी आर्थिक मदती द्यावी म्हणून आम्ही केंद्राला पत्र लिहिले आहे. केंद्राने आमच्या कराचा वाटा आम्हाला परत दिला तर ते पुरेसे आहे. देशातील 12 राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. 4663 कोटी रुपये पीक नुकसान भरपाई पोटी केंद्राला देण्याची विनंती केली आहे.

पीक नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी 2000 रुपये भरपाईचा लाभ बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्य शासनाकडून आधी जिल्ह्यातील 11 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते, त्यात बेळगाव व खानापूर तालुक्यांचा समावेश नव्हता. मात्र ऑक्टोबर महिन्यात शासनाकडून राज्यातील आणखी काही तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट केले, त्यात बेळगाव व खानापूरचाही अंतर्भाव झाला. त्यामुळे दुष्काळ भरपाईचा फायदा या वेळी संपूर्ण जिल्ह्याला मिळणार आहे. जिल्ह्यात यंदा 6 लाख 31 हजार हेक्टरमध्ये पेरणी झाली होती; पण यंदा ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा 62 टक्के इतका कमी पाऊस पडला, त्यामुळे पीक हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us