खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी :
- बेळगाव मद्रास रेजिमेंट संस्थेच्या वतीने अखिल भारतीय सर्व लोकांकरिता बॉईज स्पोर्ट्स रेजिमेंट अकॅडमी निवासी स्पोर्ट्स करिता 11ते 14 वयोगटातील मुलांची निवड चाचणी दि. 11ते 16 सप्टेंबर 2023 या अवधीत थनगराज स्टेडियम आरसी स्टेडियम आणि सेंटर वेलिंगटन उटी या ठिकाणी घेण्यात आल्या. या चाचणीमध्ये संपूर्ण देशातून हजारो मुलांनी भाग घेतला होता. धावणे इत्यादी स्पर्धा सतत सहा दिवस घेण्यात आल्या. त्याचबरोबर बॉडी फिटनेस, मेडिकल व वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा उटी येथे घेण्यात आल्या. यामध्ये बेळगाव ज्योति स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूनी भाग घेऊन कु. हरीश अनिल गोरे गर्लगुंजी, बेळगाव आणि समर्थ सतीश पाटील रणकुंडये बेळगाव या दोघांनी उत्कृष्ट मैदानी खेळ करून आपले उत्तम कौशल्य दाखविले. या दोन्ही स्पर्धकांची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ज्योती स्पोर्ट्स क्लबचे संयोजक प्रशिक्षक आणि ज्येष्ठ प्रशिक्षक कोच श्रीयुत एल जी कोलेकर गर्लगुंजी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या यशाबद्दल क्लबचे आणि सर्वांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.