बेळगाव : दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास गर्भवती महिला रस्त्याच्या बाजूला थांबले असता अचानकपणे भरधाव ऑटोरिक्षाची गर्भवती महिलेला धडक बसून तिच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सदर घटना घडली असून रात्रीच्या सुमारास महात्मा फुले रोडवर हा अपघात घडला असून वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. अपघातात अर्भकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लक्ष्मीनगर वडगाव येथील वैशाली (वय २३) नामक ही गर्भवती महिला आपला भाऊ व बहिणीसमवेत गुरुवारी रात्री कामानिमित्त महात्मा फुले रोड परिसरात आली होती. त्यावेळी दानम्मादेवी मंदिराजवळ वैशाली, तिची बहीण व इतर कुटुंबीय उभे होते. भाऊ जवळच असलेल्या डेअरीमध्ये दूध आणायला गेला होता.