IMG_20231125_220326


खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी :

  • दुचाकी स्वारकांचे वाढते अपघात म्हणजे अंगावर काटा येण्याचे प्रकार झाले आहेत कधी कुणाचा अपघात होईल हे सांगणे कठीण झाले आहे. कधी रस्त्याच्या चुकीमुळे तर कधी स्वतःच्या चुकीमुळे अपघातात वाढ होत आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या दुचेकीतील अपघाताबरोबर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या नादात एका दुचाकी तिला अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर लोंढा महामार्गावरील होनकल नजीक घडली आहे. बेळगाव पणजी हा राष्ट्रीय मार्ग सुसाट झाला असला तरी तितकाच धोक्याचा बनला आहे. सुसाट महामार्गावर वाढते अपघात त्याचबरोबर होणकल पासून लोंढ्या पर्यंत असलेला एकेरी व अर्धवट रस्ता हा देखील अपघाताचे मोठे कारण बनले आहे. अशात होनकल जवळील महामार्गाचे काम संपल्यानंतर एकेरी रस्ता असलेल्या एका खड्ड्यात दुचाकीला अपघात झाल्याने पांडुरंग इराप्पा हनबर (अंदाजे वय 32) रा. शिरोली तालुका खानापूर हा गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघाताची घटना घडताच जवळ असलेल्या सैराट धाब्याचे मालक अनंत झुंजवाडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन हायवे मार्गावर धावणाऱ्या रुग्णवाहिकेला पाचारण करून अधिक उपचारासाठी त्याला बेळगाव येथे पाठवण्यात आले. सदर युवकाच्या डोळ्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाले असून तो रक्तबंबाळ झाल्या आहे. खानापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी ही पंचनामा केला आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us